कैलास गवई यांनी सभापतीपदाचा २७ जानेवारी २०२१ रोजी राजीनामा दिला दिला होता. तो २८ जानेवारी रोजी तो मंजूर करण्भण्पयात आला होता. त्यामुळे मोताळा पंचायत समितीचे सभापतीपद रिक्त झाले होते. त्यातच ९ फेब्रुवारी रोजी मोताळा पंचायत समिती सभापती पदासाठी निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार १५ फेब्रुवारी रोजी आता निवडणूक पारपडत आहे. त्यामुळे राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. सभापतीपद हे सर्वसाधारण पदासाठी खुले असल्याने सध्या राजकीय चुरस निर्माण झाली आहे. दम्यान, आठ सदस्य संख्या असलेल्या मोताळा पंचायत समितीमध्ये सात जण सभापतीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे.
असा आहे कार्यक्रम
१५ फेब्रुवारी रोजी पंचायत समिती सभापतीपदासाठी निवडणूक होत आहे. पिठासीन अधिकारी म्हणून मोताळा तहसिलदार यांची जिल्हाधिकारी यांनी नियुक्ती केली आहे. दुपारी दोन वाजता ही सभा होईल. त्यापूर्वी सकाळी १० ते दुपारी १२ या कालावधीत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. सभा सुरू झाल्यानंतर अर्जांची छाननी होईल व अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर गरजेनुरूप मतदान घेऊन ही निवडणूक पार पडेल.