रूपाली हरिदास चव्हाण आणि समर्थ हरिदास चव्हाण अशी या घटनेतील मृतकांची नावे आहेत. १७ मार्च रोजी ते शेतात काम करण्यासाठी गेले होते. मात्र, परत आले नाहीत. त्यांचा पती हरिदास व नातेवाईकांनी शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत. दरम्यान, १८ मार्च रोजी या दोघांचेही मृतदेह गट नं. २४ मधील सीताराम चव्हाण यांच्या विहिरीत तरंगताना आढळून आले. याची माहिती गावात कळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. बुलडाणा ग्रामीण पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. दोघाही मृतकांचे पार्थिव पोलिसांनी विहिरीतून बाहेर काढले असून उत्तरीय तपासणीसाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती बुलडाणा ग्रामीणचे ठाणेदार सारंग नवलकार यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणाची सध्या बारकाईने चौकशी करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मातेची मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 4:33 AM