सावरगावतेली(जि. बुलडाणा), दि. २१- येथून जवळच असलेल्या देऊळगाव कोळ येथील २२ महिलेने आपल्या दीड वर्षाच्या चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २0 स प्टेंबर रोजी घडली. याबाबत बिबी पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या देऊळगाव कोळ येथील शिवकन्या गणेश केकान (२२) व वैष्णवी गणेश केकान (दीड वर्ष) या दोघी मायलेकीचे मृतदेह मंगळवारला राम प्रल्हाद गिरी यांच्या शेतातील विहिरीत आढळून आले. दरम्यान, मृतक शिवकन्या केकान हिचे सासरे मदन वामन केकान यांनी यासंदर्भात बिबी पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी जाफौ कलम १७४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, ठाणेदार पी.आर. उबाळे हे पुढील तपास करीत आहेत.
देऊळगाव येथे दीड वर्षाच्या मुलीसह मातेची आत्महत्या
By admin | Published: September 22, 2016 1:28 AM