शाळेतून घरी येताच कपडे बदला; अंघोळही करा
कोरोनाचा संसर्ग पाहता आर्ई-वडिलांकडून मुलगा शाळेतून आल्याबरोबर कपडे बदलून अंघोळ घालण्यात येत आहे, तसेच शाळेत पाठविताना काही सूचनांचे पालन करण्यास पालकांकडून सांगण्यात येत आहे. तोंडाचा मास्क काढू नये, सोबत दिलेल्या सॅनिटायझरने वारंवार हात धुवावे, एकाच ठिकाणी जास्त मुलांच्या मधे राहू नये, सुरक्षित अंतर ठेवावे, आपल्या मित्रांनासुद्धा याबाबत सांगावे, अशा सूचना मुलांना पालकांकडून दिल्या जात आहेत.
अ) मास्क काढू नये
ब) वारंवार हात साबणाने धुवावा किंवा सॅनिटायझर वापरावे
क) सोशल डिस्टिन्सिंग पाळावे
ड) घरी आल्यानंतर कपडे धुवायला टाकावेत आणि अंघोळ करावी.
काळजी आहेच, पण शिक्षणही महत्त्वाचे
गत दोन वर्षांपासून मुले घरीच आहेत. ऑनलाइन क्लासेस झाले; परंतु शाळेतील शिक्षण आणि ऑनलाइन शिक्षणामध्ये फरक आहे. मुलांची काळजी आहे, पण त्यांचे भवितव्यही पाहावे लागेल.
-अर्चना देशमुख.
मुलांचे भवितव्य पाहता मुलांना शाळेत पाठविणे आवश्यक आहे. शाळेत गेल्यानंतर मुलांनाही काळजी घेण्याचे सांगितले आहे. शिक्षकही मुलांवर विशेष लक्ष ठेवत आहेत.
- वैशाली फिस्के
प्रत्येकाला आपल्या मुलाची काळजी असतेच. भविष्यात त्याने काही तरी करावे, यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. याकरिता कोरोना नियम त्याला सांगून खबरदारी घेऊन शाळेत पाठवित आहोत.
- माधुरी गाभणे.
जिल्ह्यातील आठवी ते बारावीच्या एकूण शाळा - ९०१
सुरू झालेल्या शाळा - २२८
अद्याप बंद असलेल्या शाळा - ६७३