शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नांदुर्‍यात बैलगाडीवर मोटारसायकल ठेवून मोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:59 AM

नांदुरा:  पेट्रोल, डीझलचे उच्चांकी भाव, शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचे भिजत घोंगडे व शेतमालास योग्य भाव देऊन त्वरित खरेदी याकरिता सोमवारी शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे बैलगाडीवर मोटारसायकल ठेवून तहसील कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन सादर करण्यात आले.

ठळक मुद्देइंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा:  पेट्रोल, डीझलचे उच्चांकी भाव, शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचे भिजत घोंगडे व शेतमालास योग्य भाव देऊन त्वरित खरेदी याकरिता सोमवारी शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे बैलगाडीवर मोटारसायकल ठेवून तहसील कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन सादर करण्यात आले.सध्याचे पेट्रोल, डीझलचे भाव गगनाला भिडणारे असून, यामुळे वाहतूक खर्चात वाढ झाल्याने भाजीपाला, दूध, अन्नधान्यासह इतर वस्तूंचेही भाव वाढत असून, पेट्रोल, डीझल दरवाढीचा दुहेरी फटका सामान्य जनतेला बसत असून, तत्काळ भाववाढ कमी करावी. तसेच शासनाने घोषित केलेली कर्जमाफी अजूनही शेतकर्‍यांपर्यंत पोचली नसून, शासनाने शेतकर्‍यांची थट्टा, थांबवून त्वरित संपूर्ण कर्जमाफी करावी.  पिकलेला शेतीमाल सध्या कवडीमोल विकल्या जात असल्याने संपूर्ण शेतमालास योग्य भाव देण्यात यावा व संपूर्ण शेतमालाची खरेदी शासकीय दराने करण्यात यावी. याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते डॉ. प्रदीप हेलगे, मोहनराव पाटील, तालुका अध्यक्ष युवराज देशमुख, शहर अध्यक्ष नितीन मानकर, विनायक मुर्‍हे, संजय चोपडे, बाळासाहेब पाटील, मुकुंदराव मापारी, सुरेश शिंगोटे, महिला शहर अध्यक्ष गोदावरीताई जगदाळे, अनिरुद्ध पाटील, एकनाथ पाटील, अशोक पाटील, पहाडसिंग सुरडकर, अर्जुन ब्राह्मणे, भागवत बेलोकार, नीलेश भिसे, आकाश राजनकार, अनिल मानकर, पुरुषोत्तम तांबे, अतुल वानखडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आणि शेतकर्‍यांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.     

शासनाचा निषेध!शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकर्‍यांच्या विविध समस्यांकडे सातत्याने शासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने वारंवार आवाज उठविण्यात येत आहे. मात्र, तरीदेखील शासन स्तरावरून कोणतीही उपाययोजना करण्यात येत नाही. परिणामी, शासनाचा यावेळी निषेध करण्यात आला. 

टॅग्स :NanduraनांदूराagitationआंदोलनNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी