लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : पालिका कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी नगर पालिका कर्मचारी,अधिकारी संघटनेच्यावतीने शनिवारपासून काळी फित आंदोलनाला सुरूवात करण्यात आली.
नगर पालिका कर्मचाºयांना विनाअट सातवा वेतन आयोग लागू करावा, रोजंदारी कर्मचारी कायम करणे, २४ वर्ष कालबद्ध पदोन्नतीची थकबाकी आदी २० मागण्यांकरिता कर्मचारी संघटनेने १ जानेवारीपासून बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाचाच एक भाग असलेल्या काळी फित आंदोलनाला शनिवारी सुरूवात करण्यात आली. काळ्या फिती लावल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाºयांनी पालिका प्रवेशद्वारावर निदर्शने केली. त्यानंतर दिवसभर कामकाज केले. यावेळी न.प.कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनंत निळे, व महाराष्ट्र राज्य न.प.कर्मचारी संघटनेचे कार्यकारी सदस्य मोहन अहिर यांच्यासह पालिका कर्मचारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.