बुलडाणा : जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या ज्या संचालकांनी जिल्हाबँकेवर २०९ कोटीचा डल्ला मारून शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी वंचितठेवले, त्या संचालकांची वसुली करण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानीशेतकरी संघटनेचे राणा चंदन यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयातआंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनानिवेदन देण्यात आले.निवेदनात नमूद आहे की, सरकारने काही दिवसापुर्वी राज्यातील शेतकऱ्यांनाकर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. यामुळे ज्या संचालकांनी जिल्हाकेंद्रीय सहकारी बँक बुडविली त्या संचालकांना कर्ज माफीचा कोणताही फायदाशासनाने देवू नये, जिल्हा बँक बुडविणाऱ्या संचालकांची तात्काळ वसुली करुनत्यांच्या मालमत्ता शासनाने जप्त करुन बँक सुरळीत करावी, जेणेकरुनजिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज उपलब्ध होईल व नव्या दमाने पुन्हाजिल्हा बँकेत जावून पेरणीसाठी कर्ज घेईल अशाप्रकारे याबाबीकडे शासनानेलक्ष देवून संचालकांची थकीत वसुली करावी, अशा प्रकारची मागणी स्वाभिमानीशेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.मागणी पुर्ण न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पुन्हा जिल्हा बँक वप्रशासनाच्या विरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशारा यावेळी निवेदनातूनदेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर स्वाभिमानीचेजिल्हा अध्यक्ष कैलास फाटे, अमिन खासाब, ज्ञानदेव हरमकार, हरिभाऊउबरहंडे, शेख साजीद, तुषार काचकुरे, शेख रफीक शेख करीम, अनिल पडोळयांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
By admin | Published: June 24, 2017 1:46 PM