लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : शेतकर्यांचे दीड लाख रुपयांपर्यंंतचे कर्जमाफ करण्यात आल्यानंतर शेतकर्यांना १0 हजार रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करण्याचे आदेश १ जुलै रोजी जिल्हय़ातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांना देण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी या अर्थसहाय्याला मुहूर्त मिळाला असून जिल्हय़ातील ४११ शेतकर्यांच्या बँक खात्यात ४१ लाख १0 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.बुलडाणा जिल्हय़ात एकूण ५ लाख ६३ हजार १३८ शेतकरी असून त्यापैकी ४ लाख ५२ हजार ८७८ शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यातील २ लाख १७ हजार १0५ शेतकरी शासनाच्या कर्जमाफीसाठी पात्र आहेत. या शेतकर्यांच्या बँक खात्यात शुक्रवारपासून १0 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यास सुरूवात झाली आहे. १0 हजार रुपयांचे तातडीने कर्ज देण्याचे आदेश जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच व्यापारी बँकाना देण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व बँकामध्ये पात्र शेतकर्यांना अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. टप्प्या-टप्प्याने सर्व लाभार्थी शेतकर्यांना अर्थसहाय्य मिळेल.- पी. एन. श्रोत, अग्रणी जिल्हा प्रबंधक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बुलडाणा
बुलडाणा जिल्ह्यात १0 हजारांच्या अर्थसाहाय्याला मिळाला मुहूर्त!
By admin | Published: July 16, 2017 2:28 AM