लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिगाव प्रकल्प निविदा घोटाळा प्रकरणातील आठ आरोपींपैकी एक असलेले मन प्रकल्प कार्यालयाचे कार्यकारी अभियंता आर. जी. मुंदडा यांच्या जामीन अर्जावर सोमवारी खामगाव न्यायालयात सुनावणी होणार आहे.दरम्यान, प्रकरणातील दुसरे आरोपी असलेले कार्यकारी अभियंता संजय वाघ यांना २0 नोव्हेंबर रोजी खामगाव न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला होता. त्यांच्या प्रकरणाच्या संदर्भात २ डिसेंबर रोजी सुनावणी असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश पाटील यांनी दिली.जिगाव प्रकल्पाचे २00८ पासून प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. या कामापैकी एका कामामध्ये गैरप्रकार झाल्याप्रकरणी खंडपीठाच्या निर्देशानुसार खामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जिगाव प्रकल्पासंदर्भातील सात अभियंते आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. एसीबीच्या जवळपास नऊ पथकांनी पुणे, नाशिक, यवतमाळ, नांदेडसह अन्य ठिकाणी तपास करून काही कागदपत्रेही जप्त केली होती. दरम्यान, वाघ आणि मुंदडा यांनी खामगाव न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यात २0 नोव्हेंबर रोजी वाघ यांना तात्पुरता जामीन मिळाला होता. दरम्यान, मुंदडा यांनी ६ नोव्हेंबरला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने १५ नोव्हेंबरला सुनावणी ठेवली होती. पुन्हा ती २0 नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली; मात्र त्या दिवशी त्यावर सुनावणी झाली नाही. ती आता २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सध्या निविदा घोटाळा प्रकरणामुळे जिगाव प्रकल्प चर्चेत आला आहे.
मन प्रकल्पचे कार्यकारी अभियंता मुंदडाच्या जामिनावर आज होणार सुनावणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 2:10 AM
बुलडाणा : जिगाव प्रकल्प निविदा घोटाळा प्रकरणातील आठ आरोपींपैकी एक असलेले मन प्रकल्प कार्यालयाचे कार्यकारी अभियंता आर. जी. मुंदडा यांच्या जामीन अर्जावर सोमवारी खामगाव न्यायालयात सुनावणी होणार आहे.
ठळक मुद्देजिगाव प्रकल्प निविदा घोटाळाआर. जी. मुंदडा हे आठ आरोपींपैकी एक