लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सततच्या भारनियमनाला कंटाळून काँग्रेसच्या नगरसेवकांनी बुधवारी नगरपालिकेच्या विद्युत विभागातील कर्मचार्यांना आतमध्ये कोंडून कुलूप ठोकले. शहरात गत काही दिवसांपासून रात्री विद्युत पुरवठा खंडित होतो. तसेच विद्युत विभागाचे कर्मचारी फोन घेत नाहीत. रमजान महिना सुरू असतानाही शहरात सर्वत्र अंधार पसरला आहे. त्यामुळे काँंग्रेसचे नगरपालिकेतील गटनेता आकाश दळवी यांच्या नेतृत्वात नगरसेवक सैयद आसिफ, मोहमंद अफसर, बंडू काळवाघे, शहर उपाध्यक्ष मोहमद अजहर, सरचिटणीस युवक काँग्रेस शैलेश खेड.कर, युवक काँग्रेस कार्यकर्ते अमोल पवार, नीलेश सरकटे, सूरज राजपूत, राजू मोरे, संदेश फाटे, निखिल दळवी, सचिन सिरसाट, गणेश जाधव, झुबेर खान, शुभम मिटकारी यांनी कर्मचार्यांना आतमध्ये कोंडून कुलूप ठोकले. उप मुख्याध्याधिकारी देशपांडे यांनी कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर कर्मचार्यांना सोडण्यात आले.
नगरपालिकेच्या कर्मचा-यांना कोंडले!
By admin | Published: June 22, 2017 4:32 AM