लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील स्वच्छतेकडे पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शहरातील विविध चौक आणि मुख्य रस्त्यांवर कचऱ्याचे ढिग साचल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे. स्वच्छ सर्वेक्षण-२०२० करीता पालिका प्रशासनाकडून तयारी केली जात असतानाच, दुसरीकडे शहरातील स्वच्छतेचा विसर पालिकेच्या आरोग्य विभागाला पडला असल्याची जोरदार चर्चा शहरात होत आहे.पावसाळ्याच्या अनुषंगाने विविध साथ रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेता, उपाययोजना म्हणून आरोग्य विभागाकडून स्वच्छता आणि किटक नाशक फवारणी करण्याचे सुचविले जात आहे. त्याचवेळी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील कचºयाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्या जात आहे.स्वच्छ सर्वेक्षण-२०२० अंतर्गत केंद्रीय समितीच्यावतीने खामगाव शहराचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आगामी काही दिवसांत या सर्व्हेक्षणाच्या अनुषंगाने खामगाव पालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्यात. यामध्ये शहराच्या विविध भागासाठी शहर स्वच्छता समन्वयाचीही नियुक्ती केली गेली. सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता राखण्यासाठी एक अॅक्शन प्लानही तयार करण्यात आला. मात्र, स्वच्छ सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश असलेल्या स्वच्छतेचाच पालिकेला विसर पडल्याचे चित्र शहरात विविध ठिकाणी दिसून येत आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या जाहिराती लावण्यात आलेल्या ठिकाणीच कचºयाचे मोठे ढिग साचल्याचे दिसून येते. स्वच्छ सर्वेक्षणासाठी पालिकेची कागदोपत्रीस्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत केंद्रीय समितीद्वारे विचारण्यात येणाºया संभाव्य १२ प्रश्नांचे एक पत्रक शहरात वितरीत करण्यात आले आहे. यामध्ये संभाव्य प्रश्नांची उत्तरे तयार करून देण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षणात शहराला जास्तीत जास्त गुण मिळवून देण्यासाठी पालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्याचवेळी शहरातील कचºयाकडे दुर्लक्ष होत असल्याने पालिकेची स्वच्छ सर्वेक्षणाबाबतची भूमिका दुटप्पी असल्याची चर्चा होत आहे.
खामगावातील स्वच्छतेकडे पालिकेचे दुर्लक्ष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 3:08 PM