लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: प्रेमप्रकरणात बाधा ठरत असलेल्या पतीचा प्रियकर व त्याच्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीने खून करून त्याचा मृतदेह आवळखेड शिवारातील शेतात गाडून टाकल्याप्रकरणी सागवन गायरान शिवारातील एका महिलेसह तिच्या तीन साथीदारांना बुलडाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेच्या तब्बल १५ दिवसानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्यामुळे गायरान परिसरात खळबळ उडाली आहे.बुलडाणा शहरालगतच असलेल्या सागवन गावातंर्गतच्या गायरान परिसरात राहणाºया एका महिलेचे तिच्या घराशेजारीच राहत असलेल्या अनिल सुरूशे नामक व्यक्तीशी प्रेमकरण जुळले होते. दरम्यान त्यांच्या दोघांच्या संबंधामध्ये महिलेचा पती गणेश सरोजकर अडसर ठरत असल्याने त्याचा काटा काढण्याचे त्यांनी ठरवले. त्यासाठी अनिल सुरोशे याने त्याचे महेंद्र खिल्लारे (रा.नांद्राकोळी), अरुण निकाळजे (रा. हतेडी) यांचे सहकार्य घेतले.२५ मे रोजी गणेश सरोजकर यास एका दुचाकीवर बसवून हतेडी येथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे पैसे आणण्यासाठी जावयाचे आहे, असा बहाणा करून त्यांनी आवळखेड शिवारात अरुण निकाळजे याच्या शेतात नेले. तेथे त्याला मद्यामध्ये विषारी औषध पाजले. गणेश सरोजकरला अस्वस्थ वाटू लागले असता त्याचा चौघांनी रुमालाने गळा आवळून खून केला व पार्थिव तेथेच शेतात गाडले.या प्रकरणी सागवन येथील पोलिस पाटील मनिषा समाधान जाधव यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अनिल सुरूशे, दिव्यांग महिला लिला गणेश सरोजकर महेंद्र खिल्लारे आणि अरुण निकाळजे यांना ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.घटनेचा पुढील तपास ठाणेदार प्रदीप साळुंके, कोकीळा तोमर, गजानन लहासे व अन्य पोलिस सहकारी करीत आहेत. गाडलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन४२५ मे रोजी खून करून गणेश सरोजकर याचे पार्थिव चिखला शिवारातील शेतात गाडण्यात आले होते. रात्रीच बिट जमादार कोकिळा तोमर यांच्यासह बुलडाणा शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी चिखला शिवार गाठून घटनास्थळाची पाहणी केली. सोबतच मृत व्यक्तीचे पार्थिव जिल्हा सामान्य रुग्णालयात इनक्वेस्ट पंचनामासाठी आणण्यात आले आहे.
सतत होत होते वादप्रेमसंबंधावून मृतक व त्याच्या पत्नीमध्ये नेहमीच वाद होत होते. त्यातच मृतक हा सराईत गुन्हेगार होता. त्यामुळे त्याच्या विरोधात बुलडाणा पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल होते. प्रकरणी तो आपल्याला व आपल्या प्रियकराला मारून टाकले या भीतीपोटी मृत व्यक्तीच्या पत्नीने प्रियकराला हाताशी धरून गणेश सरोजकरला संपविण्याचा कट आखला होता.या कटाची अंमलबजावणी करण्यास अनिल सुरुशेच्या दोन सहकाºयांनीही त्यास मदत केली.