लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मध्यंतरी जिल्ह्यात पडलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील खडकपूर्णा व कोराडी प्रकल्प वगळता अन्य प्रकल्पामध्ये पाण्याची आवक समाधानकारकस्तरावर होत असून घाटाखालील मस आणि ज्ञाननंगगा प्रकल्प जवळपास भरण्याच्या मार्गावर आहेत, तर चिखली शहरासाठी जिवनदायी ठरणाऱ्या मोठ्या प्रकल्पात मोडणाºया पेनटाकळी प्रकल्पातील जलसाठाही ६४ टक्क्यांवर पोहोचला आहे.दुसरीकडे जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ७०.१५ पाऊस पडला असून गतवर्षीच्या तुलनेत विचार करता हा पाऊस ३० टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्याला एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. दरम्यान, संग्रामपुर तालुक्याची वार्षिक सरासरी ही १०३.३० टक्क्यांवर पोहोचली आहे. बुलडाणा, शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद तालुक्यांचीही टक्केवारी ही ९० टक्क्यांच्या आसपाल आली आहे. दरम्यान, या पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या प्रकल्पामध्ये १२७ दलघमी पाणीसाठा झाला आहे. दुसरीकडे पलढग प्रकल्प १०० टक्के भरलेला असतानाच आता मस हा मध्यम प्रकल्पही ९२ टक्के भरला असून ज्ञानगंगा प्रकल्पातील जलसाठा हा ७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे खामगावची उन्हाळ््यातील संभाव्य पाणीटंचाई दुर होण्यास मदत झाली असून पेनटाकळी प्रकल्पतील जलसाठा हा ६४.३३ टक्क्यांवर पोहोचला असून या चिखलीकरांची संभाव्य पाणीटंचाईची समस्या त्यामुळे निकाली निघण्यास मदत झाली आहे. खडकपूर्णा प्रकल्प अद्यापही मृतसाठ्यात असून या प्रकल्पामध्ये वर्तमान स्थितीत ३४.५५ दलघमी पाणीसाठा असून या प्रकल्पामध्ये उपयुक्त पाण्याची पातळी गाठण्यासाठी अद्यापही ३० दलघमी पाण्याची अवश्यकता आहे. मात्र खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अद्यापही अपेक्षीत असा दमदार पाऊस झालेला नसल्याने येथे समस्या आहे. नाही म्हणायला बुलडाणा जिल्ह्यातील या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळेच वर्तमान स्थितीत याप्रकल्पात किमान पक्षी ३४.५५ दलघमी पाणीसाठा आहे. दुसरीकडे पलढग प्रकल्पामध्ये १०० टक्के पाणीसाठा असून याप्रकल्पामधून तीन सेमीने पाण्याचा विसर्ग सध्या होत आहे. मस व ज्ञानगंगा प्रकल्पामध्ये बºयापैकी पाणीसाठा झाल्याने या प्रकल्पांखालील गावामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान, दोन ते तीन दिवसापासून पावसाने जिल्ह्यात उघडीप दिली आहे.
मस, ज्ञानगंगा प्रकल्प भरण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:37 PM