गावातील कोणी आजारी आहे का? कोणाला सर्दी, ताप आहे का? याविषयी माहिती घेण्यात येत आहे. लक्षणे आढळणाऱ्यांना क्वारंटाईन करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या तीन खाेल्यांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामविकास अधिकारी सदाशिव म्हस्के यांनी सर्व नियोजन केले आहे. गाव पातळीवर जिल्हा परिषद शिक्षक, आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांना प्रभाग वाटून दिला आहे. अंगणवाडी क्र. १, २, ३,च्या अंगणवाडी सेविका संगीता गजानन मोरे व मदतनीस सुरेखा पारधे, आशा वर्कर्स व जिल्हा परिषदेचे शिक्षक संदीप पुरी, संजय पवार, दशरथे, आशा साखरे, आशा वर्कर्स सुमन शिंगणे, सुरेखा गायकवाड, संगीता लोखंडे, अंगणवाडी सेविका, नीता जागृत, वंदना शेळके, रंजना काळे, विमल शेळके, शकुंतला सरदार यांनी सोमवारपासून वाॅर्डनिहाय सर्वेक्षण सुरू केले आहे. या वेळेस सरपंच प्राजक्ता नितीन इंगळे, ग्रामपंचायत सदस्य समाधान बनसोडे, ग्रामविकास अधिकारी सदाशिव म्हस्के उपस्थित होते.
प्रशासनाच्या आदेशानुसार गावस्तरीय समिती स्थापन करुन समितीच्या सदस्यांना त्यांचे कामे समजावून सांगितले आहे. त्यानुसार सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले आहे. याकरिता नागरिकांनी समिती सदस्यांना सहकार्य करावे.
सदाशिव म्हस्के, ग्रामविकास अधिकारी, हिवरा आश्रम.