शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

‘माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 4:36 AM

डोणगाव : ‘माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा’ या मोहिमेंतर्गत शेलगाव देशमुख येथे तहसीलदार यांच्या हस्ते ...

डोणगाव : ‘माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा’ या मोहिमेंतर्गत शेलगाव देशमुख येथे तहसीलदार यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शेतकऱ्यांना सक्षम करणाऱ्या ई- पीक पाहणी प्रकल्पाची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १३ ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. त्याअनुषंगाने ‘माझी शेती माझा सात बारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा’ या मोहिमे अंतर्गत जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात मेहकर तालुक्यातील ई-पीक पाहणीची सुरुवात तहसीलदार संजय गरकल यांनी १९ ऑगस्ट रोजी शेलगाव देशमुख सांज्यातील तालुक्याचे प्रगतिशील शेतकरी शरद शिवप्रसाद केळे यांचे शेतातून केली. यावेळी शेतकऱ्यांना त्यांच्याच मोबाईलवरून पीक पेऱ्याची माहिती, जलसिंचनाच्या साधनाची माहिती ऑनलाईन ॲपवर कशी भरायची व पिकाचे फोटो कसे अपलोड करावयाचे याबाबतचे मार्गदर्शन स्वत: तहसीलदार संजय गरकल यांनी केले. संबधित शेतकऱ्यांचा पीक पेरा प्रत्यक्ष शेतात भरून घेतला. मेहकर तालुक्यातील सर्वच गावामध्ये ई- पीक पाहणीची सुरुवात झाली असून, स्वत: तहसीलदार यांनी शेलगाव देशमुख सांज्यातील शेतकरी शरद केळे, सुनंदा किसन खंडारे यांच्या बांधावर जाऊन ऑनलाईन पीक पेरा भरण्याचे मार्गदर्शन केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी काळे, विस्तार अधिकारी मेटांगळे, ग्रामविकास अधिकारी डी. पी. काळे, शिवाजी पंडागळे, तलाठी अशोक शेजुळे, बालाजी तिरके, लिपिक महादेव कड्डक, ग्रामरोजगार सेवक विष्णू आखरे, कोतवाल किशोर पातुरकर, भगवान बघे, शरद केळे, दिलीप आखरे, रंजित पाटील, अशोक म्हस्के, एकनाथ खराट, विनोद गोरे, विनोद ताकतोडे व शेतकरी बांधव उपस्थित होते. ई- पीक पाहणी प्रकल्प हा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, यामध्ये शेतकरी त्यांच्या मोबाईल ॲपमधून आपल्या पीक पेऱ्याची माहिती जलसिंचनाची साधने, पिकाची परिस्थिती, बांधावरील झाडे इत्यादी नोंदी स्वत: घेऊन त्यांचे छायाचित्र अपलोड करू शकतात. संबंधित तलाठी यांचे लॉगिनवरून त्याला मान्यत: मिळाल्यानतर ही माहिती वेबसाईटवर अद्ययावत करण्यात येते.

असे आहेत ॲप्सचे वैशिष्ट्य

हा ॲप हाताळण्यासाठी अत्यंत सोपा असून, ॲंड्रॉईड फोनवरुन मराठी भाषेमधून माहिती भरता येते व एका मोबाईल क्रमांकावरुन १० शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत करता येते. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर ‘ई- पीक पाहणी’ या नावाने सर्वांसाठी नि:शुल्क उपलब्ध असून, तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पीक पेऱ्याची माहिती अद्ययावत करावी असे आवाहन तहसीलदार संजय गरकल यांनी केले.