मेहकर : नाफेडच्यावतीने मेहकर तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री संस्था म. मेहकरच्या माध्यमातून शासकीय आधारभूत किंमत योजना अंतर्गत हरभरा खरेदी खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष विनोदबापू देशमुख यांच्या हस्ते सोमवारी सुरुवात करण्यात आली.
या योजनेंतर्गत ५,१०० रु. प्रती क्विंटल दराने एफएक्यू प्रतीचा हरभरा खरेदी करण्यात येत असून कास्तकारांनी हरभरा विक्रीकरिता ऑनलाइन नोंदणी करावी. साफ व स्वच्छ केलेला माल विक्रीकरिता केंद्रावर आणावा व या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. हरभरा ऑनलाइन नोंदणी सुरू असून कास्तकारांनी २०२०-२१ हंगामचा हरभऱ्याची नोंद असलेला ७/१२, पेरेपत्रक, आधार कार्डची व सुरू असलेल्या राष्ट्रीयीकृत बँक खात्याची झेरॉक्स प्रत संस्थेकडे सादर करून नोंद करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे संचालक रविकुमार चुकेवार, भास्करराव घोडे, भागवतराव देशमुख, विजयराव काळे, विश्वनाथ शेळके व इतर संचालक तसेच संस्थेचे व्यवस्थापक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.