सुतारकाम करणाऱ्यांना आर्थिक मदत द्या
साखरखेर्डा : लाॅकडाऊनमुळे सुतारकाम करणाऱ्या कारागिरांवर आर्थिक संकट आले आहे. सिंदखेड राजा तालुक्यात सुतार व्यवसाय करणाऱ्या कामगारांची संख्या जास्त आहे. कामे बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे, त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी ज्ञाानेश्वर जाधव यांनी केली आहे.
प्रशासकीय इमारतींमध्ये पार्किंगची व्यवस्था करा
बुलडाणा : प्रशासकीय इमारतीमध्ये विविध कार्यालये आहेत. इमारत परिसरात पार्किंगची कुठलीही व्यवस्था नाही. त्यामुळे वाहनधारक कुठेही आपली वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीस अडथळा येत आहे. त्यामुळे या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी शिवसंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गायकवाड यांनी केली आहे.
शिंदी येथे १०९ जणांची काेराेना तपासणी
सिंदखेडराजा : काेराेना रुग्णांची वाढती संख्या पाहता साखरखेर्डा प्राथमिक आराेग्य केंद्राच्या वतीने शिंदी येथील उपकेंद्रात १०९ जणांची काेरेाना चाचणी करण्यात आली. ग्रामसेवक अर्जुन गवई व सरपंच विनाेद खरात यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते
दुकान फाेडण्याचा प्रयत्न सीसी कॅमेऱ्यात कैद
बुलडाणा : शहरातील एका दुकानाचे शटर ताेडून चाेरी करण्याचा प्रयत्न करणारे चाेरटे सीसी कॅमेऱ्यात कैद झाले. या प्रकरणी दुकान मालकाच्या तक्रारीवरून पाेलिसांनी अज्ञाात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहरात गत काही दिवसांपासून चाेरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
निमखेड परिसरात अवैध दारू विक्री
सिंदखेड राजा : तालुक्यातील निमखेड व परिसरात गत काही दिवसांपासून अवैध दारू विक्री माेठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे, अनेक युवक व्यसनाधीन हाेत आहे. याकडे पाेलिसांचे दुर्लक्ष हाेत असल्याचे चित्र आहे. गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी महिला व दारुबंदी जन आंदाेलन समितीने केली आहे.