नांद्रा : लोणार तालुक्यातील नांद्रा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील शाळेची एक व ग्रामपंचायतची एक अशा दोन खोल्या शिकस्त झाल्या आहेत. ह्या शिकस्त झालेल्या खोल्या विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीचे १९४९ मध्ये बांधकाम झाले आहे. या खोलीच्या समोरील व्हरांड्यावरिल टिनपत्रे वादळवाºयात उडुन गेली. त्यामुळे त्या खोलीच्या भ्ािंतीला तडे गेले आहेत. खोलीच्या सभोताल मोकळी जागा असल्याने विद्यार्थी तेथे नेहमीच खेळत असतात. सध्या पावसळ्याचे दिवस असल्याने पावसाचे पाणी भिंतीत मुरून ती भींत कोसळण्याची भिती आहे. यामुळे पालक नेहमीच चिंता व्यक्त करत आहेत. परंतु संबधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने ही धोकादायक खोली पाडण्याची प्रशासन वाट पाहते की काय? असा प्रश्न निर्माण होतो. तर दुसरी खोली ग्रामपंचायतची शाळेच्या आवारात असुन ती सुध्दा शाळा खोलीला लागुनच आहे. तिचे बांधकाम विटामातीचे असुन तिच्या दोन्ही बाजुच्या भिंतीस दरवाजापेक्षा मोठे छिद्र आहे. त्यावर पावसाचे पाणी पडत असल्याने माती विरघळुन कोसळण्याची जास्तच भिती आहे. विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धासुध्दा याच शाळेच्या आवारात होतात. या केंद्रातील आठवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी खेळण्यासाठी येतात. शिकस्त खोल्यामुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे.
नांद्रा येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोल्या शिकस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 1:54 PM
नांद्रा : लोणार तालुक्यातील नांद्रा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील शाळेची एक व ग्रामपंचायतची एक अशा दोन खोल्या शिकस्त झाल्या आहेत. ह्या शिकस्त झालेल्या खोल्या विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहेत.
ठळक मुद्देयेथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीचे १९४९ मध्ये बांधकाम झाले आहे. सध्या पावसळ्याचे दिवस असल्याने पावसाचे पाणी भिंतीत मुरून ती भींत कोसळण्याची भिती आहे. . शिकस्त खोल्यामुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे.