लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या जन्मोत्सवानिमित्त देशाच्या व महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपर्यामधून जिजाऊ भक्तांचा महासागर मातृतीर्थ जिजाऊ नगरीत उसळला. हातामध्ये पताका, डोक्यावर भगवा फेटा बांधून तर नारी शक्ती जिजाऊंच्या वेशभूषा करून मुखाने ‘जय जिजाऊ, जय शिवराय’ यांचा जयघोष करीत जिजाऊ मासाहेबांना अभिवादन करीत होते, तर संत नामदेव-तुकाराम वारकरी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गंगाधर महाराज कुरूंदकर (हिंगोली) व प्रा. गणेश महाराज कापसीकर जिल्हा परभणी यांनी टाळ-मृदंग वीणा घेऊन भजनी मंडळीसह जिजाऊ शिवबाच्या नामाचा जयघोष करीत जिजाऊंना अभिवादन केले. त्यांच्यासोबत सिंदखेडराजा तालुक्यातील शेलगाव, पिंपळगाव येथील दिंडी सोहळ्यांनी सहभाग घेतला होता.
राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त जिजाऊ नगरीत उसळला जनसागर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 01:54 IST
सिंदखेडराजा : राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या जन्मोत्सवानिमित्त देशाच्या व महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपर्यामधून जिजाऊ भक्तांचा महासागर मातृतीर्थ जिजाऊ नगरीत उसळला.
राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त जिजाऊ नगरीत उसळला जनसागर!
ठळक मुद्देकेवळ एकच जयघोष ‘जय जिजाऊ, जय शिवराय’डोक्यावर भगवे फेटे व सर्वत्र भगव्या पताका