चिखली : स्थानिक तात्यासाहेब महाजन कला, वाणिज्य महाविद्यालय व श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आभासी पद्धतीने पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची १२९ वी जयंती राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरी करण्यात आली.
महाविद्यालयात नवीन ग्रंथाची ग्रंथप्रदर्शन तर तात्यासाहेब महाजन महाविद्यालयात प्रतिमापूजन करण्यात केल्यानंतर आभासी पद्धतीने डॉ. एस. आर. रंगनाथन आणि ग्रंथालयाचे महत्त्व या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. या परिसंवादाचे उद्घाटन शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमराज देशमुख यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुभाष गव्हाणे होते. आस्माबी कलीम शहा, रोहित जाधव या विद्यार्थ्यांसह प्राचार्य देशमुख, डॉ. गव्हाणे यांनी मनोगत व्यक्त केले. परिसंवादाचे संचालन ग्रंथपाल डॉ. प्रदीप बारड, प्रास्ताविक प्रा.डॉ. वनिता पोच्छी तर आभार प्रा. विजय वाकोडे यांनी मानले. प्रा.डॉ. प्रफुल गवई, प्रा.डॉ. दिलीप महाजन, प्रा.डॉ. नागेश गायकवाड, प्रा. मनीष पालवे, प्रा. सतीश मोरे, प्रा. उल्हास ब्राह्मे, सागर गवई, भागवत झगरे, सुरेश कांबळे, प्रा.डॉ. राजू गवई, प्रा.डॉ. गणेश मालटे, प्रा.डॉ. इंतियाज जूकलकर, प्रा.डॉ. जगदेव जाधव, प्रा.डॉ. शालिनी काटोले, प्रा.डॉ. मुक्ती जाधव, प्रा.डॉ. मीना निकम, प्रा.डॉ. सुनीता कलाखे, राजेंद्र सवाई, संजय भगत आदींसह विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.