२८ फेब्रुवारी हा डॉ.सी.व्ही. रमन यांचा जन्मदिन देशभर विज्ञान दिन म्हणून साजरा केल्या जातो. अंधश्रद्धा आणि कालबाह्य अनिष्ट रुढी, परंपरा, धर्मभोळेपणा यात न अडकता विज्ञानाची मशाल हाती घेऊन विवेकाच्या मार्गाने जाणारा नवतरुण हा या देशाची खरी संपत्ती असल्याचेही महाराजांचे विचार होते, असे मत आर. बी. मालपाणी यांनी मांडले. विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी परदेशात संशोधन करतात, काही विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी शासनाची शिष्यवृत्ती घेत आहेत. याबाबत समाधान व्यक्त करून शेती, मातीवर संशोधन झाल्यास काबाडकष्ट करणाऱ्या दरिद्रीनारायणाच्या रूपात उभा असलेला आपला अन्नदाता आनंदाने जगू शकेल. त्याचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी त्यांच्या बांधावर जाऊन त्याला सुधारित बी-बियाणे, अत्याधुनिक यंत्रसामग्री व शास्त्रीय ज्ञान देण्याची जबाबदारी अभ्यासकांची आहे, असेही ते म्हणाले.
मेहकर येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 4:40 AM