बुलडाणा : वाढत्या इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने २९ मे रोजी निषेध आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाºयांना यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. शासनाने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसवर लावलेल्या करामुळे भाववाढ झाली आहे. सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती निम्म्यापेक्षा कमी झाल्या असताना पेट्रोल व डिझेलचे दर अर्धे कमी होणे अपेक्षित होते. परंतू राज्य व केंद्र सरकारने ५० टक्केपेक्षा अधीक कर लावून जनतेला महागाईच्या खाईत लोटले. पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्याने जनता वैतागली आहे. तसेच स्वयंपाकाचा गॅस ४०० रुपयांवरुन ८०० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे गृहिणींचे रसोईचे बजेट कोलमडले आहे. दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक वस्तूंचे भाव वाढल्यामुळे जगणे कठीण झाले आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने वाढत्या महागाईचा निषेध करण्यात आला. सर्वच वस्तुंच्या वाढलेल्या किंमती कमी कराव्या, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अनिता शेळके, डॉ. प्रभा चिंचोले, नंदा पाऊलझगडे, सरस्वती टेकाळे, रजनी चित्ते, भागूबाई कोल्हे, लक्ष्मी शेळके, मंगला वायाळ, नाझिमा खान, रुक्मिना वाकोडे, कल्याणी शिंगणे, अरुणा दहेकर, कालिंदा कोल्हे, मंदा गवते, सुनीता जाधव, कविता ढोके, तारामती शिंगणे, रेखा मुळे, शोभा जाधव, सखुबाई काटे, वैशाली शेळके, ज्योस्त्ना धूड, रंजना माळी, वंदना जाधव, आशा खनसरे, अनिता नारखेडे, जिजा रिंढे, आशा हिवाळे, सुनीता राऊत, सुमन महाले, शांताबाई पवार, हर्षा सोनटक्के, रेखा हिवाळे, शोभा सुसर, पंचशिला तायडे, चंद्रकला घुगे यांच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.