लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : गणेशाेत्स्ववाप्रमाणाेच सार्वजनिक नवरात्रोत्सव, दुगार्पूजा व दसरा सणही साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना १४ ऑक्टाेबर राेजी जारी केल्या आहेत. यामध्ये देवीचे आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. मंडपामध्ये गर्दी होऊ न देणे, तसेच इतर काही उपाययोजना करणायाच्या सूचना करण्यात आल्या असून साध्या पध्दतीनेच यावर्षी नवरात्राेत्सव साजरा करण्यात येणार आहे. सार्वजनिक नवरात्राेत्सवासाठी मंडळांनी नगरपालिका, नगरपंचायत, पोलीस प्रशासन यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि नगरपालिका तसेच प्रशासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळांसाठी ४ फूट व घरगूती देवीच्या मुर्तीची उंची २ फुटांची ठेवण्याची परवानगी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.जिह्यातील नगर पालिका हद्दीत याेग्य ती खबरदारी घेण्याचे आदेशही देण्यात आला.
नवरात्राेत्सवामध्ये यावर राहिल बंदीगरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. देवीचे आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मुर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये. मंडपात एकावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपांमध्ये खाद्यपदार्थ अथवा पेय पानाची व्यवस्था करण्यास मनाई असेल. विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्रात असेल तर मुर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल. प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी एस.रामामूर्ती यांनी निर्गमीत केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे.