लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : फसव्या घोषणांच्या जोरावर सत्तेत आलेले हे सरकार कृतीत शून्य असून, त्यांनी केलेल्या एकाही घोषणेची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाही. तीच गत कर्जमाफीचीसुद्धा असून, ही कर्जमाफी म्हणजे लबाडाचे आमंत्रण असल्याचा आरोप माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केला.सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सर्व शेतकर्यांची सरसकट १00 टक्के कर्जमाफी करण्यात यावी, शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५0 टक्के नफा हमीभाव देण्यात यावा, कृषी मालाची खरेदी करण्यात यावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, रब्बी हंगामासाठी शेतकर्यांना पीककर्ज ता तडीने देण्यात यावे आणि भारनियमन बंद करण्यात यावे, या मागण्यांसाठी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ६ ऑक्टोबर रोजी स्थानिक तहसील कार्यालयासमोर एल्गार आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ.राजेंद्र शिंगणो बोलत होते. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचे पैसे दिवाळीपर्यंत शेतकर्यांच्या खात्यात जमा न झाल्यास तहसील कार्यालयात दिवाळी साजरी करण्याचा इशारा यावेळी तालुकाध्यक्ष गजानन वायाळ यांनी दिला. प्रसंगी सुधीर पडघान, संजय गाडेकर, शहराध्यक्ष रवींद्र तोडकर यांनीसुद्धा पक्षाच्यावतीने केल्या जाणार्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट करून इंधन दरवाढ आणि कर्जमाफीसाठी घा तलेल्या जाचक अटी विरोधात सरकार विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. दरम्यान, या आंदोलनानंतर तहसीलदार चिखली यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ.शिंगणे, माजी मंत्री भारत बोंद्रे, पांडुरंग पाटील, गुलाबराव खेडेकर, शंतनु बोंद्रे, भगवानराव काळे, गजानन वायाळ, रवी तोडकर, राम खेडेकर, शेखर बोंद्रे, गौरव खंडेलवाल, डॉ.प्रकाश शिंगणे, प्रशांत एकडे, कुसूम देशमुख, संजय खेडेकर, भिकाजी खेडेकर, रामदास खेडेकर, बाळु खेडेकर, विलास तोडे, देवानंद पाटील, o्रीकृष्ण मिसाळ, शिवाजी शिराळे, गणेश कोरके, प्रवीण घड्याळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
देऊळगाव राजा येथे राष्ट्रवादीचे आंदोलनदेऊळगावराजा : मागील तीन वर्षांपासून हे सरकार फक्त शे तकर्यांची फसवणूक करीत आहे. कर्ज मुक्तीच्या नावाखाली शेतकर्यांची दिशाभूल करण्याचे काम केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टी व शिवसेना सत्तेत आल्यापासून करीत आहेत. राज्यामधल्या शेतकर्यांच्या प्रश्नांवर प्रचंड आंदोलने होऊनसुद्धा भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या सरकारने अजूनही या बाब तीत योग्य ती पावले उचललेली नाहीत, म्हणून जो पर्यंत सरकार जागे होत नाही, तोपर्यंत शेतकर्यांच्या हितासाठी राष्ट्रवादी पक्ष लढणार, असा इशारा माजी आरोग्यमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिला. ६ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.राजेंद्र शिंगणे व जिल्हाध्यक्ष अँड.नाझेर काझी यांच्या नेतृत्वा त एल्गार देऊळगाव राजा येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यासाठी बस स्थानक चौकातून हजारो शेतकर्यांसाठी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यक र्त्यांनी तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चा काढून सरकार विरोधात घोषणा केली. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष डॉ.रामप्रसाद शेळके, गंगाधर जाधव, जिल्हा परिषद सदस्य रियाजखा पठाण, पंचायत समिती सभापती रजनी चित्ते, बाजार समिती सभापती नि तीन शिंगणे, तालुकाध्यक्ष राजीव सिरसाठ, कार्याध्यक्ष सदाशिव मुंढे, राजू चित्ते, माजी नगराध्यक्ष तुकाराम खांडेभराड, संतोष खांडेभराड, कविश जिंतुरकर, सरस्वती टेाकळे, अनिल रामाणे, सुनीता सवडे, नगरसेविका दीपमाला गोमधरे, रंजना शिंगणे, कल्याणी शिंगणे, गजानन पवार, बद्री शिंदे, पराजी खांडेभराड पदाधिकारी व कार्यकते उपस्थित होते.