खामगाव: नगराध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पक्षादेश झुगारणे राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांच्या अंगलट येणार असल्याचे संकेत आहेत. पक्षादेश न पाळणार्या चार नगरसेवकांचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. नगरपालिकेतील अभद्र युती संपुष्टात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच नगरसेवकांना व्हीप बजावण्यात आला होता; परंतु असे असतानाही खामगाव नगरपालिकेतील एका नगरसेविकेसह जळगाव जामोद नगरपालिकेतील दोन महिला नगरसेविका आणि एका नगरसेवकाने पक्षादेश पायदळी तुडविल्याचे आज निवडणुकीनंतर स्पष्ट झाले. खामगाव येथे नगरसेविका वर्षाताई बोबडे यांनी पक्षादेश झुगारून शहर विकास आघाडीच्या बाजूने मतदान केले. त्याचप्रमाणे जळगाव जामोद येथील नगरसेविका अनिता मिश्रा, शहनाज सुलताना सै. जावेद, सखाराम ताडे यांनी पक्षादेश नाकारला. त्यामुळे या नगरसेवकांविरोधात कारवाई होण्याचे संकेत आहेत.
राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांवर कारवाईचे संकेत !
By admin | Published: July 17, 2014 11:02 PM