राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांच्यासह अन्य कार्यकत्यांनी आंदोलनात भाग घेतला. तहसीलदार सुनील सावंत यांना निवेदन देण्यात आले. भाजप प्रणित केंद्र सरकारने घरगुती गॅस तसेच डिझेल, पेट्रोलच्या किमती बेसुमार वाढविल्याने केंद्र सरकारचा तीव्र निषेध करत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी झुणका भाकर खाऊन कार्यकर्त्यांनी केंद्र सरकाच्या धोरणाचा निषेध केला. बेसुमार दरवाढ झाल्यामुळे शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व महिलांचे आर्थिक नुकसान होत आहे. जनता कोरोनाच्या महामारीमुळे अगोदरच हवालदिल झालेली आहे. घरगुती गॅस, डिझेल पेट्रोलच्या किमती या सरकारने दुप्पट केल्यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडण्याचे पाप केंद्र सरकारने केले असल्याचा आरोप या आंदोलनातून करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तीव्र निषेध करत केंद्र सरकारने केलेली दरवाढ ही तातडीने रद्द करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदारांकडे निवेदनातून दिला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष शिवाजी राजे जाधव, शहराध्यक्ष राजेंद्र अंभोरे, सतीश काळे, ॲड. संदीप मेहेत्रे, शेख यासीन, संजय मेहेत्रे, नितीन चौधरी, मंगेश खुरपे, विलासराव देशमुख, राजू ठोके, आरेफ पठाण यांच्यासह राष्ट्रवादीचे तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे झुणका भाकर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:23 AM