लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्गाची बुलडाणा जिल्ह्यातील साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात राजस्थान मधील ‘भिलवाडा पॅर्टन’ लागू करण्यात यावा, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटेचे नेते रविकांत तुपकर यांनी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनाही त्यांनी निवेदन दिले आहे.बुलडाणा जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा १७ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन केले असले तरी त्याचे गांभिर्य अद्याप अनेकांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे त्याचा फज्जा उडाला आहे. परिणामी बुलडाण्याप्रमाणेच २८ लाख लोकसंख्या असलेल्या भिलवाडा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या पॅटर्नची बुलडाणा जिल्ह्यात अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी तुपकर यांनी केली आहे.त्यासाठी नागरिकांना जीवनावश्यक वस्तू थेट घरपोच पोहोचविण्याचे नियोजन यंत्रणेने करणे गरजेचे झाले आहे. ते झाल्यास नागरिक घराबाहेर पडणार नाही व कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल. प्रशासकीय पातळीवर त्याबाबत नियोजन करण्याची गरज आहे. राजस्थान मधील भिलवाडा जिल्ह्याने याच पद्धतीचा अवलंब करत तेथील संसर्ग नियंत्रणात आणला आहे. त्यामुळे तो बुलडाणा जिल्ह्यात राबविण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावेलॉकडाऊनची मुदत वाढू शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आतापासूनच प्रभागनिहाय प्रभागनिहाय पथके तयार करून जिवनावश्यक वस्तू घरपोच देण्याचे नियोजन करावे. त्यासाठी लोकप्रतिनिधी, स्थानिक नगरसेवक, स्वंयसेवी संस्थांची मदतही घेतल्या जावू शकते. प्रसंगी आम्हीही स्वयंसेवक म्हणून भूमिका निभावू.
त्यासाठी प्रशासनाने लोकप्रतिनिधी व अधिकाºयांना विश्वासात घेवून नियोजन करावे, अशी मागणीही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तसा एक व्हीडीओही त्यांनी समाज माध्यमावर टाकला आहे. घरपोच जीवनावश्यक वस्तू मिळाल्यास नागरिक बाहेर निघणार नाही व कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल, असेही त्यांनी म्हंटले आहे.