शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

सार्थकला हवी कॉक्लीअर इनप्लॉटसाठी मदत

By admin | Published: June 15, 2017 7:28 PM

जन्मत: ऐकू येत नसल्यामुळे अनेक अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : निसर्ग असो, संगित असो किंवा एखाद्या व्यक्तीच्या मनातल्या भावना यासारखे भावविश्व अनुभवण्यासाठी प्रथम आपल्याला ऐकू येणे आवश्यक आहे. मात्र जन्मत ऐकू येत नसल्यामुळे या भावविश्वापासून येथील सोळंके ले-आऊटमधील सार्थक डांगे वंचित असून यासाठी कॉक्लीअर इनप्लॉट शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीची गरज आहे.बुलडाण्यातील सोळंके ले-आऊटमधील प्रदीप डांगे व प्रिती डांगे यांचा मुलगा सार्थक डांगे वय ८ हा येथील महात्मा फुले शाळेत दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे. मुळात हुशार असलेल्या सार्थक डांगेला जन्मता ऐकू येत नसल्यामुळे विविध अडचणी येत आहेत. समोरच्या व्यक्तीच्या बोलताना ओठावरील हालचाली किंवा खाणा खुणामुळे त्याला कळेल, समजेल तेवढे तो ज्ञान ग्रहण करीत असतो. मात्र ऐकू येत नसल्यामुळे काही गोष्टीपासून तो अनभिज्ञ असतो. त्यामुळे शाळेत, शिक्षण घेताना तसेच घरी असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत अकोला, औरंगाबाद, पुणे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा उपचार व सल्ला घेवून शेवटी पुणे येथील रूबी क्लिनीकने कॉक्लीअर इनप्लॉट शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. यासाठी ८ लाख रूपये खर्च येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे डांगे कुटुंबिय चिंतेत पडले. सार्थकचे वडील प्रदीप डांगे एक पतसंस्थेत डेली रिकरिंगचे काम करतात. त्यांच्या महिन्याचे मिळकतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह व मुला-मुलीचे शिक्षण पूर्ण होत आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेसाठी कोणतीही रक्कम शिल्लक राहत नसल्यामुळे सार्थकच्या शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या रक्कमेसाठी काही दानशूर व्यक्तींनी मतदतीचा हाथ देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र सदर रक्कम शस्त्रक्रियेसाठी पुरेशी नसल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत द्यावी, यासाठी प्रदीप डांगे, अजित रेसीडेन्सी, सोळंके ले-आऊट, बुलडाणा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रदिप डांगे यांनी केली आहे.