लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना संक्रमण जिल्ह्यात वाढत असल्याने जिल्ह्यात जमावबंदी लागू केलेली असतांनाच कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज निर्माण झाला आहे. गेल्या एक महिन्यात एकूण नोंदणी केलेल्या हेल्थ वर्कर्स व फ्रंटलाइन वर्कर्सच्या तुलेत ४१ टक्केच कर्मचाऱ्यांना लस देण्याचे काम पुर्ण झाले आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात १९ हजार ५० आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट होते. त्यातुलनेत १५ नोव्हेंबरपर्यंत ७,७९९ कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले आहे. अद्यापही ११ हजार २५१ कर्मचाऱ्यांना लसीकरण करणे बाकी आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग तुलनेने मंदावलेला आहे. जिल्ह्यात एकूण १३ केंद्रांवर सध्या लसीकरणाची मोहीम सुरू आहे. याच पद्धतीने लसीकरणाचा वेग राहिला, तर आगामी एक वर्ष लसीकरण मोहीम पूर्ण करण्यास लागणार असल्याचे संकेत आहे. मुळातच कोरोना लसीकरणाची मोहीम ही आतापर्यंतच्या लसीकरणाच्या मोहिमेच्या तुलनेत मोठी आहे. एकंदरीत व्याप्ती पाहता किमान सहा ते आठ महिने ही मोहीम जिल्ह्यात राबवावी लागणार असल्याचे संकेत यापूर्वीच सूत्रांनी दिले होते. जिल्ह्यातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्राचा विचार करता महत्तमस्तरावर ५ हजार २०० जणांना लस दिली जाऊ शकते. मात्र सध्या जिल्हयातील १३ केंद्रावरच लसीकरण माहिम राबविण्यात येत असून दुसऱ्या टप्प्यातील १२५ जणांचे ही लस दिली.
१९ हजार डोस उपलब्धजिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १९ हजार डोस उपलब्ध झाले होते. त्यापैकी आतापर्यंत ७,७९९ आरोग्य कर्मचाऱ्यांना हे डोस देण्यात आलेले आहेत. साठा उपलब्ध आहे. पण हे लसीकरण अन्य लसीकरणाच्या तुलनेत वेगळे व वेळखाऊ आहे. त्यासोबत सतर्कताही त्यात अधिक ठेवावी लागते. तसेच या लसीचे तापमानही २ ते ८ अंश सेल्सियसदरम्यान मेन्टेन ठेवावे लागते. त्यामुळे शीतकरण साखळीची यात मोठी भूमिका आहे. यासह काहींमध्ये लसीकरणाबाबत भीती असून, जिल्ह्यात प्रत्यक्षात १३ केंद्रांवरच सध्या लसीकरण होत आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेचा वेग मंद आहे.
१५ दिवसांत ९७१ बाधितजिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत ९७१ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. अद्यापही जिल्ह्यात हेल्थ वर्कर्स व फ्रंटलाइन वर्कर्सनाच लसीकरण करण्यात येत आहे. त्यानंतर दुर्धर आजार असणारे, लहान बालके व अन्य नागरिकांना लसीकरण होणार आहे. त्यामुळे कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे.