खामगाव: पहिल्याच पावसात खामगाव बुलढाणा मार्गाचा भराव वाहून गेला. त्यामुळे रस्त्याला या काठाहून दुसर्या काठापर्यंत आरपार छिंद्र पडले. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. मात्र, राज्य महामार्ग विभागाकडून कोणत्याही हालचाली करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे वर्णा फाटा ते दिवठाणा फाट्यादरम्यानच्या रस्त्यावर एका ठिकाणी हा रस्ता पूर्णत: खचला आहे.
खामगाव आणि परिसरात झालेल्या पावसामुळे खामगाव बुलडाणा मार्गावरील वर्णा फाटा ते दिवठाणा फाट्यादरम्यना एका ठिकाणी रस्त्या खालील मलबा, मुरूम वाहून गेला. या काठापासून त्याकाठापर्यंत छिंद्र पडल्यामुळे पोकळ झालेला भाग गुरूवारी सकाळपासूनच खचला आहे. याबाबत तब्बल दोन दिवसांत सा.बां. राज्य महामार्ग विभागाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे नजीकच्या काळा या ठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अनिल मुंढे यांनी केला आहे.
साईट अभियंत्याकडून दिशाभूलरस्ता खचल्यानंतर या रस्त्याचे काम करणार्या कंत्राटदारांनी संबंधित अभियंत्यांशी संपर्क केला. मलबा वाहून गेलेल्या ठिकाणी मुरूम टाकण्यात आल्याची माहिती साईट इंजिनिअर कडून वरिष्ठांना देण्यात आली. मात्र, शुक्रवारी सकाळपर्यंत या ठिकाणी दुरूस्ती असता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोपही मुंढे यांनी केला आहे.
नागरिकांनी टाकली काटेरी झुडपेरस्ता खचल्याने पोकळी निमार्ण झालेल्या ठिकाणी रोहणा, वर्णा आणि काळेगाव येथील काही नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काटेरी झुडपे टाकली. तसेच काही नागरिक येथे थांबून वाहन धारकांना सतर्कतेच्या सूचना देत असल्याचे समजते. अपघात टाळण्यासाठी सामाजिक दृष्टीकोनातून काही जण वाहन धारकांना माहिती देत आहेत.