- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात रेशीम शेतीला चालना मिळत असून, या उत्पादनात वाढ करण्यासाठी नवा अजेंडा रेशीम विभागांतर्गत आखण्यात येत आहे. वर्षभरामध्ये रेशीम कोष निर्मिती ५७ हजार ६२३ किलो गॅ्रम झाली आहे. यातून सुमारे एक कोटी ७३ लाख रुपयांचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले आहे.रेशीम शेती हा व्यवसाय शेतीस पूरक व्यवसाय आहे. अत्यंत कमी खर्चात आणि शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून हा व्यवसाय करता येतो. जिल्ह्यात रेशीम उद्योग वाढविण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयांतर्गत नियोजन करण्यात येत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शेतांमध्ये रेशीम शेती करावी. रेशीम विकास प्रकल्प राबवावा, अशा सुचना जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी केल्या आहेत. त्यानुसार जिल्हा रेशीम कार्यालयाकडून अंमलबजावणी सुरू झाली आहे. यावेळी एक हजार एकरवर तूती लागवड करण्याचा संकल्प प्रशासनाचा आहे. त्यानुसार सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू झाले आहेत. ७ ते २१ जानेवारी या कालावधीत रेशीम शेतीची माहिती सर्व शेतकरी वर्गास होण्यासाठी प्रचार व प्रसार रेशीम रथाद्वारे जिल्हाभर करण्यात आला. कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाºया नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतंर्गत जिल्ह्यातील ४४१ गावांमध्ये रेशीम शेती विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. तुती रोप वाटीका, तुती लागवड, रेशीम किटक संगोपन साहित्य व संगोपन गृह यासाठी मनरेगातंर्गत तीन वर्षामध्ये २ लाख ९५ हजार १५० रूपयांचे अनुदान कुशल व अकुशल स्वरूपात देण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरामध्ये जिल्ह्यात ५७ हजार ६२३ किलो कोष काढण्यात आले आहे. यामध्ये १ कोटी ७३ लाख २० हजार ६७५ रुपये उत्पादन शेतकºयांना झाले आहे. यावरही आता उत्पादन वाढविण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत. २३ जानेवारीला संबंधीत अधिकाºयांची रोहयोच्या उपजिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीतून सुद्धा उत्पादन वाढविण्याच्या अनुषंगाने सुचना अधिकारी व कर्मचाºयांना देण्यात आल्या.
जिल्ह्यात रेशीम उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जास्तीत जास्त शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा. ३० जानेवारीपर्यंत नवीन तुती लागवडीसाठी शेतकºयांना नोंदणी करता येणार आहे.- संजय धामणे, रेशीम विकास अधिकारी, बुलडाणा.