- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : राज्यभरात कोरोनाच्या काळात नवनवीन प्रयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या कृतिशील शिक्षकांशी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आॅनलाईन चर्चा केली असून, आगामी काळात शाळा सुरू न करता विद्यार्थ्यांना कशाप्रकारे शिक्षण देता येईल, याबाबत चाचपणी घेण्यात आली.कोरोनामुळे यावर्षी शिक्षण व्यवस्था पूर्णता कोलमडली आहे. अनेक शाखांच्या परीक्षा अद्याप व्हायच्या आहेत. दरवर्षी जून महिन्यात शाळा ुसुरू होतात. यावर्षी मात्र जुलै महिना अर्धा संपत आला तरी अद्याप शाळा सुरू करण्यात आल्या नाहीत. आगामी काळात शाळा केव्हा सुरू होणार याबाबत अनिश्चितता आहे. शाळेत मुलांना पाठविण्यास पालक तयार नाहीत. मुलांना शाळेत एकत्र आणल्यावर कोरोना होण्याचा धोका आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकत्र न आणता त्यांच्यापर्यंत कोणत्या माध्यमातून शिक्षण पोहोचविण्यात येईल, याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी चाचपणी घेतली.कोरोनाच्या काळात तीन महिने शाळा बंद असल्या तरी राज्यातील अनेक शिक्षकांनी आॅनलाईन विविध प्रयोग करून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविले. अशा राज्यभरातील प्रयोगशील शिक्षकांशी वर्षा गायकवाड यांनी आॅनलाईन चर्चा केली. तसेच त्यांची पद्धती जाणून घेतली. तेल्हारा तालुक्यातील खंडाळा येथील शिक्षक तुळशीदास खिरोडकर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी रेडीओवर एक वाहिनी सुरू केली. त्या माध्यमातून दररोज एक धडा विद्यार्थ्यांना शिकविण्यात येतो. अशाप्रकारे राज्यात विविध प्रयोग करणाºया शिक्षकांनी वर्षा गायकवाड यांना माहिती दिली.सदर माहिती ऐकून यातील एखाद्या पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना शिक्षण देता येईल काय? याबाबत शिक्षण विभाग चाचपणी करीत आहे.शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विविध प्रयोग करून कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचविणाºया राज्यभरातील शिक्षकांशी संवाद साधला. शाळा न भरविता विद्यार्थ्यांना कशाप्रकारे शिक्षण देता येईल, याची चाचपणी यावेळी करण्यात आली.- तुळशीदास खिरोडकरशिक्षण, जि. प. शाळा, खंडाळा