वर्षभरातच रस्त्यावर खड्डे
बुलडाणा : तालुक्यात अनेक ठिकाणांचे रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहेत. मात्र, काही ठिकाणचे रस्ते एका वर्षांतच पुन्हा उखडण्यास सुरुवात झाली आहे. वर्षभरातच रस्त्यावर खड्डे पडत असल्यामुळे अशा रस्ते कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
शाळांचे वीजदेयके थकली
धामणगाव बढे : काही जिल्हा परिषद शाळा, महाविद्यालयांकडे वीजदेयके थकली आहेत. कोरोनाच्या काळात निधीअभावी शाळा, महाविद्यालयांकडून विद्युत देयके भरण्यात आली नाहीत. त्यामुळे महावितरणकडून काय कार्यवाही होते, याकडे लक्ष लागले आहे.
नळ योजनेला गळती
बुलडाणा: नळ योजनेला अनेक भागांत गळती लागल्याने पाणी वितरणाचे नियोजन विस्कळीत झाले आहे. शहरालगतच्या गावांमध्येही दहा ते बारा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यातही अर्ध्या तासाच पाणी येत असल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे. बुलडाणा शहरासह परिसरातील गावांनाही येळगाव धरणावरून पाणीपुरवठा करण्यात येतो.