नदीपात्रापासून अवघ्या ५० ते ७० फूट अंतरावर बसविण्यात आले. पावसाळ्यात पैनगंगा नदीला पूर येताे व पुराचे पाणी नदी पात्रापासून १ किलोमीटरपर्यंत दोन्ही बाजूला पसरते. तसेच जेथे रोहित्र बसविण्यात आले आहे त्या ठिकाणी पुराचे १० ते १२ फूट पाणी राहते. त्यामुळे पावसाळ्यातील चार महिने त्या रोहित्रावरून संपूर्ण गावातीलच विद्युत पुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे.
या बाबत संबंधित ठेकेदार व ग्रामीणचे उपअभियंता यांच्याशी संवाद साधला असता जागा बदल करण्यात येईल असे सांगितले होते. परंतु जागा बदल न करता त्याच ठिकाणी रोहित्र बसविण्यात आले. याचा नाहक त्रास गावकऱ्यांना चार महिने होणार आहे.
पावसाळ्यात नदीला पूर आल्यास रोहित्रामध्ये पुराचे पाणी जाऊन गावातील विद्युत पुरवठा खंडित होणार आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या दिवसात सर्वच सवणावासीयांना अंधारात राहण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याअगोदरच गावकऱ्यांच्या सल्यानुसार ज्या ठिकाणी पुराचे पाणी जात नाही अशा ठिकाणी रोहित्र बसविण्यात यावे, अशी मागणी हाेत आहे.