शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

बुलडाणा तालुक्यातील ३ ग्रामपंचायतीमध्ये नवीन सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 5:48 PM

बुलडाणा : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमध्ये पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल २७ डिसेंबर रोजी जाहीर झाले. त्यात साखळी खुर्द, पिंपळगांव सराई आणि घाटनांद्रा या ग्रामपंचायतींमध्ये पहिल्यांदाच जनतेतून निवडून आलेले सरपंच गावचा कारभार हातात घेणार आहेत.

ठळक मुद्देसाखळीत रंजीत झाल्टे, घाटनांद्रामध्ये संजय कन्नर व पिं.सराईमध्ये प्रदीप गायकवाड तहसील कार्यालयमध्ये उपविभागीय दंडाधिकारी तथा तहसीलदार सुरेश बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. 

बुलडाणा : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमध्ये पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल २७ डिसेंबर रोजी जाहीर झाले. त्यात साखळी खुर्द, पिंपळगांव सराई आणि घाटनांद्रा या ग्रामपंचायतींमध्ये पहिल्यांदाच जनतेतून निवडून आलेले सरपंच गावचा कारभार हातात घेणार आहेत. याशिवाय तिनही ठिकाणी इतर सदस्यांची निवडणूकही झाली. तालुक्यातून एकुण ४ जण अविरोध निवड झाली आहे तर साखळी येथील एक जागा रिक्त राहिली आहे. दरम्यान निवडणुकांचे निकाल जसे जसे घोषित होते, बाहेर गदीर्तील विजयी उमेदवारांच्या समर्थकांमध्ये गुलालाची उधळण आणि जल्लोषाचे वातावरण दिसून आले. येथील तहसील कार्यालयमध्ये उपविभागीय दंडाधिकारी तथा तहसीलदार सुरेश बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी एस.जी. गिरी यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार गणेश माने, निर्वाचन विभागाच्या नायब तहसीलदार मंजुषा नैतान, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पुजा सावळे तसेच इतर कर्मचारी वर्गाने निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. निकालानुसार साखळी खु. येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग पदातून सरपंचपदासाठी रंजीत विजयराव झाल्टे विजयी झाले आहेत. त्यांना एकुण ३०२ मते मिळाली. विजय सखाराम तायडे २७९ मतांसह दुसºया क्रमाकांवर राहिले. तर शाह सादिक शाह यांना १६३ मते प्राप्त झालीत. पिंपळगांव सराई येथे सरपंचपदासाठी दुहेरी लढत झाली. यात प्रदीप शेषराव गायकवाड १६२६ मतांसह विजयी ठरले. त्यांनी केशव पुंजाजी तरमळे यांचा सुमारे ४७७ मतांनी पराभव केला. याठिकाणी सरपंच पद ओबीसी प्रवगार्साठी राखीव आहे. घाटनांद्रा या ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून संजय ज्ञानदेव कन्नर निवडून आले आहेत. सर्वसाधारण गटातून झालेल्या सरपंचपदाच्या लढतीत कन्नर यांना ७०७, प्रकाश दगडू शेवाळे यांना ४२३ आणि भगवान धरिसराव सोर यांना २१७ मते मिळाली आहेत. या तिनही ग्रामपंचायतमध्ये सदस्य याप्रमाणे आहेत. साखळी खु. प्रभाग क्र. १ मध्ये साधना राजु हिवाळे (अनु. जाती स्त्री), ध्रृपदाबाई रमेश ठाकरे (अनु. जाती), प्रभाग क्र. २ मध्ये विनोद पुनाजी सुरडकर (अनु. जाती) आणि सुषमा शेखर देशमुख (नामाप्र) तर प्रभाग क्र. ३ ब रमेश सोमनाथ सुरडकर आणि क मधून अनिता महेंद्र वाठोरे (सर्वसाधारण स्त्री) निवडून आले आहेत. साखळी खु. येथे ठाकरे, देशमुख, सुरडकर आणि वाठोरे असे चार सदस्य यापूर्वीच अविरोध म्हणून घोषित झालेले आहेत, हे विशेष. तर प्रभाग क्र. ३ अ मध्ये अनुसूचित जाती या प्रवगार्साठी एक अर्ज आला होता. परंतु छाननी प्रक्रियेत हा अर्ज एकमेव अर्ज बाद झाल्यामुळे या ठिकाणची जागा आता रिक्त आहे. पिंपळगांव सराई येथे प्रभाग क्र. १ मध्ये रामदास भागाती खुर्दे, संजय काशिराम तरमळे, प्रभाग क्र. २ मधुकर आनंदा गायकवाड आणि शेखर नसरीन अंजुम शेख रफिक, प्रभाग क्र. ३ शेख जहीर शेख कासम, मीना दिलीप खेते आणि द्दीन जाकेरा बी फायाजो द्दीन तसेच प्रभाग क्र. ४ मधून देवेेंद्रसिंह रामसिंह ठाकूर आणि उषा राजेंद्र गवते यांची निवड झाली असून शेवटचा प्रभाग क्र. ५ मध्ये रविंद्रप्रसाद मदनप्रसाद शुक्ला, निर्मला बबन पाटोळे आणि दिलशाद अस्लमखान पठाण हे विजयी झाले आहेत. घाटनांद्रा ग्रामपंचायतमध्ये निवडून  आलेली सहा सदस्य याप्रमाणे आहेत. प्रभाग क्र. १ रोहिदास परमेश्वर दगडू, रामकोर अंबादास भुसारी, सरला जनार्धन सोर हे तीन सदस्य तसेच प्रभाग क्र. २ मध्ये संतोष हरीभाऊ नरोटे, अर्चना समाधान चव्हाण आणि संदीप विष्णू शेवाळे यांना जनतेने संधी दिली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाElectionनिवडणूकsarpanchसरपंच