लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमाने अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा प्रस्ताव मागे घे तल्यामुळे सदर संमेलन आता कुठे होते, याबाबत साहि ित्यकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. याबाबत साहित्य महामंडळ निर्णय घेणार असून, त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. तसेच हिवरा आश्रम येथे संमेलन होऊ शकले नाही, तर बुलडाण्याची विदर्भ साहित्य महामंडळाची शाखा प्रस्ताव पाठविणार आहे. ९१ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन घेण्याकरिता देशभरातून सहा प्रस्ताव आले होते. त्यापैकी तीन ठिकाणांची पाहणी करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. यामध्ये दिल्ली, बडोदा व हिवरा आश्रमचा समावेश होता. दिल्लीने प्रस्ताव मागे घेतल्यामुळे बडोदा किंवा हिवरा आश्रम या दोन पैकी एका ठिकाणी संमेलन घेण्याचा पर्याय महामंडळापूढे होता. त्यापैकी हिवरा आश्रम हे स्थळ निवडण्यात आले. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील साहित्यिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते; मात्र अंनिसने विरोध दर्शविल्यानंतर विवेकानंद आश्रमाने प्रस्ताव मागे घेतला. संमेलन स्थळ निश्चित झाल्यानंतर प्रस्ताव मागे घेण्यात आला, तर अन्य स् थळांचा विचार करण्यात येतो. यावेळी दिल्लीने प्रस्ताव मागे घेतल्याने केवळ आता बडोदा हेच एकमेव स्थळ आहे. त्यामुळे महामंडळ बडोद्याला प्राधान्य देते की पुन्हा नव्याने प्रस्ताव मागविते, याकडे साहित्य वतरुळाचे लक्ष लागले आहे. याबाबत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्री पाद भालचंद्र जोशी यांना विचारणा केली असता, त्यांनी महामंडळ चर्चा करून याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले. संमेलन रद्द झाल्यामुळे जिल्ह्यातील साहित्यिकांमध्ये नाराजी आहे. तसेच ही साहित्य क्षेत्रातील अपरिमित हानी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यानंतरही ही संधी मिळेल की नाही, अशी चिंताही व्यक्त केली. साहित्य महामंडळाने प्रस्ताव मागितले, तर बुलडाणा येथील विदर्भ साहित्य संघाची शाखा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. ९१ वे संमेलन जिल्ह्यातच व्हावे, अशी साहि ित्यकांची इच्छा आहे. त्यामुळे आता बुलडाणा येथे संमेलन घेण्याकरिता प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
जिल्हय़ातील साहित्य क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच जिल्हय़ाला अखिल भारतीय संमेलन आयोजित करण्याची संधी मिळाली होती; मात्र ती संधी हिरावल्या गेली. आता यानंतर संधी केव्हा येईल, याची शाश्वती नाही. बुलडाणा जिल्हय़ाला मोठी वाड्मयीन परंपरा लाभली आहे. त्या परंपरेला पुन्हा संमेलनाच्या माध्यमातून उजाळा मिळाला असता. - अजिम नवाज राही, कवी, साहित्यिक, बुलडाणा.
हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमाने प्रस्ताव मागे घे तला आहे. त्यामुळे आता महामंडळ पुढील दिशा ठरविणार आहे. त्यानुसार निर्णय घेण्यात येणार आहे. - श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ.
हिवरा आश्रम येथे काही कारणास्तव संमेलन होऊ शकले नाही; मात्र आम्ही जहाज सोडले नसून, जर महामंडळाने पुन्हा प्रस्ताव मागितला, तर बुलडाणा येथे संमेलन घेण्यासाठी प्रस्ताव पाठविणार आहे. संमेलन यशस्वीपणे घेऊन दाखवू. - नरेंद्र लांजेवार,साहित्यिक बुलडाणा.
संमेलन जिल्हय़ात न होणे हे दुर्दैव आहे. इतिहासात पहिल्यांदाच जिल्हय़ात संमेलन होणार होते. हा जिल्हय़ाचा गौरव होता. जिल्हय़ाला साहित्याची मोठी परंपरा लाभली आहे. संमेलनामुळे जिल्हय़ाचे नाव साहित्य क्षेत्रात मोठे होणार होते. - गोविंद गायकी, साहित्यिक, बुलडाणा.
साहित्य संमेलन जिल्हय़ात न होणे ही सांस्कृतिक हानी आहे. या पिढीला मिळालेली ही खूप मोठी संधी होती. साहि त्य परंपरेला उजाळा मिळाला असता; मात्र ती हिरावल्या गेली. महामंडळाचा कारभार सध्या नागपूरला असल्यामुळे ही संधी मिळाली. यानंतर कारभार दुसरीकडे गेला, तर कदाचित मिळणार नाही. - सुरेश साबळे, साहित्यिक, बुलडाणा.