लोणार (बुलडाणा) : तालुक्यातील अजिसपूर येथील निसर्गमित्र अनिल धंदरे या युवकाने शहरातील ३0 व्यावसायिकांना तुळशीचे रोपटे देऊन अनोख्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत केले आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. परिणामी ग्लोबल वार्मिंगचे दुष्परिणाम वाढत असून, पावसाचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. वाढत्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत असून, अवेळी पाऊस, गारपीट यासारखे नैसर्गिक संकट २0१४ मध्ये उभे राहिल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी, शेतमजूर अडचणीत आला. यामुळे गतवर्षी घडलेल्या चुकांची पुनरावृत्ती येणार्या २0१५ नवीन वर्षात घडू नये यासाठी तालुक्यातील अजिसपूर येथील निसर्गमित्र अनिल धंदरे या तरुणाने शहरातील ३0 व्यावसायिकांना तुळशीचे रोपटे देऊन अनोख्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत केले आहे. मानवी जीवनात तुळशीचे मोठे महत्त्व असून, दैनंदिन जीवनात तुळस ही पूजनीय वनस्पती असून, तुळशीमुळे सभोवतालचे वातावरण स्वच्छ आणि निरोगी राहते. तुळशीची मंजिरी सर्व देवांची प्रतिनिधी मानले जाते; परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे पूर्वी घराच्या अंगणात दिसणारे तुळशीचे रोपटे आता दिसेनासे झाले आहे. यामुळेच अजिसपूर येथील अनिल धंदरे या तरुणाने शहरातील ३0 व्यावसायिकांना नववर्षानिमित्त तुळशीचे रोप भेट देऊन तुळस दुकानासमोर लावून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहनही केले.
तुळशीचे रोपटे देऊन नववर्षाचे स्वागत
By admin | Published: January 01, 2015 12:40 AM