बुलडाणा : आघाडी आणि युती तुटल्याने जिल्ह्यातील सातही मतदारसंघात आता चुरशीने मतदान होणार असून, त्यामुळे धक्कादायक निकालाची शक्यता व्यक्त होत आहे. नवीन मतदार झालेले युवक या निवडणूक प्रक्रियेत ह्यकिंगमेकरह्ण ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच लोकसभा निवडणुकीनंतर २७,९१९ मतदारांनी नोंदणी केली आहे. त्यात आचारसंहिता जाहीर झाल्यानंतही झालेल्या मतदार नोंदणीमुळे वाढ झाली आहे. त्यामुळे वाढलेली नवमतदारांची संख्या लक्षणीय असून, प्रशासनाने मेहनत घेऊन केलेल्या प्रयत्नांमुळे व जनजागृतीमुळे जिल्ह्यात मोठय़ा संख्येने नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. हे मतदार पहिल्यांदाच एखाद्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे त्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी सार्याच पक्षांनी कंबर कसली आहे. दुसरीकडे प्रशासनाने मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी विविध प्रकारे जनजागृती सुरु केली आहे. महिला मतदारांबरोबरच राजकीय पक्षांनी नवमतदारांनाही आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. आघाडी आणि युती संपुष्टात आल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रमुख उमेदवारांचीही संख्या वाढली असून, सार्यांनीच ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आघाडी युतीमधील घटक पक्षांची मते विभागली जाणार असून त्यामुळे बर्याच ठिकाणी निवडणुकी त विजयी उमेदवार हा कमी फरकाने विजयी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या पाच महिन्यात नव्याने नोंदणी झालेल्या २७,९१९ मतदारांच्या निर्णयाकडे सार्यांचे लक्ष असणार आहे. या म तदारांसाठी मतदानाचा हा पहिलाच अनुभव असणार आहे. त्यामुळे हा अनुभव घेण्यासाठी सारी तरूणाई एक्साईटआहेत.
नवमतदार ‘किंगमेकर’
By admin | Published: October 07, 2014 12:00 AM