ठळक मुद्देलव्हाळा फाट्यावरील घटना९ लाख १ हजार ४८0 रुपयांचा माल चोरट्यांनी केला लंपाससीसी कॅमेरांसह डाटा मशिनही पळवली
लोकमत न्यूज नेटवर्कसाखरखेर्डा : साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत लव्हाळा फाट्यावर ३ सप्टेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी कृषी सेवा केंद्र फोडून नगदी रकमेसह ९ लाख १४८0 रुपयांचा माल लंपास केला.लव्हाळा फाट्यावरील आचल कृषी सेवा केंद्र चोरट्यांनी फोडून दुकानातील कीटकनाशक औषधी, सीसी कॅमेरा, मेन डाटा मशीन आणि नगदी ५६ हजार ५00 रुपये, असा एकूण ९ लाख १ हजार ४८0 रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला.