बुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. शुक्रवारी आणखी नऊ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच दहा जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. १६३० काेराेना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये दे. राजा तालुका सातेफळ १, चिखली तालुका कोनड खु १, हिवरखेड १, संग्रामपूर तालुका लाडणापूर १, बुलडाणा शहर ३, शेगाव, ता. येऊलखेड १, परजिल्हा लोहारा, ता. बाळापूर येथील एकाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे तसेच आजपर्यंत सहा लाख ९५ हजार ५३९ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. आज राेजी १०५० नमुने काेविड निदानासाठी घेण्यात आले आहेत.
७३ रुग्णांवर उपचार सुरू
जिल्ह्यात आज अखेर एकूण ८७ हजार ४५६ कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी ८६ हजार ७१० कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोविडचे ७३ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत ६७३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.