नीलेश शहाकार / बुलडाणा जागो ग्राहक जागो, अशी जाहिरात करून जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न शासनस्तरावर होत असला, तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र ग्राहकांची फसगत होत असल्याचे चित्र आहे. अ प्रमाणित वजन-मापे आणि काट्यातून ग्राहकांची फसवणूक होत आहे. जिल्ह्यातील १३ हजार ४३५ इलेक्ट्रॉनिक व पारंपरिक वजनमापे कार्यरत आहेत; मात्र वैधमापन विभागाच्या दुर्लक्षामुळे यापैकी ९ हजार ९0 वजनमापे पासिंगच झाले नसल्याची बाब पुढे आली आहे. बुलडाणा शहरासह ग्रामीण भागात अनेक दुकानांमध्ये व रस्त्यावरील विक्रेत्यांकडून ग्राहकांची फसवणूक होत आहे. बर्याच दुकानामध्ये काटा पासिंग केलेला नसतो, वजन प्रमाणित नसतात; मात्र ग्राहकांना वस्तू त्याच काट्यावर मोजून दिल्या जातात. नियमाप्रमाणे प्रतिवर्षी वजन काट्यांचे पासिंग करणे आवश्यक असते. त्यासाठीचे प्रमाणपत्र मिळविणे गरजेचे असते; मात्र काही अ पवादास्पद दुकानदार वगळता जिल्ह्यातील बर्याच दुकानदारांनी अद्यापही आपल्या काट्याचे पासिंग केले नाही. जिल्ह्यात सध्या विविध दुकानदार, मुख्य व्यावसायिक, लहान कारखाने, किराणा दुकानदार, स्वस्त धान्य दुकानदार, बियाणे व्यावसायिक, भाजी व फळ विक्रेते व इतर लहान-मोठय़ा व्यावसायिकांकडे १३ हजार ४३५ इलेक्ट्रॉनिक व पारंपरिक वजनमापे कार्यरत आहे. त्यापैकी बुलडाणा सहायक नियंत्रक वैधमापन विभागाकडून केवळ ४ हजार ३३५ वजनमापाची तपासणी करून पासिंग करून घेतली. त्यामुळे इतर ९ हजार ९0 वजनमापे दोषपूर्ण असून, त्यातून ग्राहकांची फसगत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कारवाईची उद्दिष्टपूर्ती नाहीयेथील सहायक नियंत्रक वैधमापन विभाग, बुलडाणा सध्या कोमात आहे. त्यामुळे येथील कर्मचारी व अधिकार्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या महसुली वर्षात विभागाला ३४ लाख ३0 हजाराचे उद्दिष्ट देण्यात आले होते; मात्र बुलडाणा कार्यालयाने केवळ १७ लाख ४२ हजारांचा महसूल मिळवून दिला. २0१५-१६ या वर्षात वजनमापे तपासणी व दंड वसुलीसाठी जिल्ह्याभरात ६७१ कार्यवाही केल्या. तपासणी प्रक्रिया रखडली!जुने तराजू व वजन मापे प्रमाणित आहेत किंवा नाही, इलेक्ट्रॉनिक काट्यामागे सील तसेच पासिंगची तारीख तपासणी करणे आवश्यक आहे. ग्राहक जागृती कार्यक्रमातून ही प्रक्रिया राबविली जाते; मात्र या कार्यक्रमासाठी शासनाकडून पुरेसे अनुदान मिळत नाही. माग दुकानदारांवर कारवाई करुन आपले वैयक्तिक हितसंबंध खराब का करावे, ही भूमिका अधिकारी घेताना दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यात तपासणी प्रक्रिया रखडली आहे.
नऊ हजार वजन काट्यांचे ‘पासिंग’ नाही!
By admin | Published: March 15, 2016 2:16 AM