लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : पौष पौर्णिमेचा मुहरूत साधत २ जानेवारीला जाधवांच्या किनगावराजा, मेहूणाराजा, आडगावराजा, उमरद, जवळखेड व देऊळगांवराजा शाखेच्या पुढाकारातून राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या पूर्वापार परंपरेनुसार आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या हस्ते जिजाऊ महापुजा करण्यात आली. यावेळी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली.शासकीयस्तरावर १२ जानेवारी हा जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्याच्या अगोदर पासून अनेक वर्षापासून दरवर्षी पौष पौर्णिमेला जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात येतो, यामध्ये वारकरी संप्रदायाचा मोठा सहभाग असतो. तसेच शिवसेनेने सुध्दा आपल्या भूमिकेवर ठाम राहत पौष पौर्णिमेलाच जिजाऊ पुजनाचा कार्यक्रम कायम ठेवला आहे. मात्र यावर्षी राजे लखुजीराव जाधव यांच्या शाखा व कुळ वंशज असणारे आडगावराजा, किनगावराजा, मेहूणाराजा, उमरद, जवळखेड व देऊळगांवराजा येथील राजे जाधव परिवाराच्या पुढाकाराने या जिजाऊ जन्मोत्सवाचे स्वरुप लोकउत्सव व्हावा या उद्देशाने पौष पौर्णिमा ते १२ जानेवारी असा जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्याचा मानस यावेळी राजे गणेशराव जाधव यांनी बोलून दाखवला.सर्व प्रथम सकाळी सुर्याेदयी जिजाऊ जन्मस्थळी शिवसेनेतर्फे आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या हस्ते जिजाऊ पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी जाधवांच्या कुळ वंशजांचे हस्ते महापुजा करण्यात आली. जिजामाता जन्मोत्सव समितीचे सदस्य त्र्यंबकराव ठाकरे व महिला बालकल्याण सभापती द्रोपदीबाई ठाकरे यांनी जिजाऊंचा महाभिषेक केला. यावेळी हभप सखाराम महाराज, छगन मेहेत्रे, शिवसेना शहरप्रमुख संजय मेहेत्रे, सतिष काळे, म्हसाजी वाघ, न.प.सदस्या सरस्वती मेहेत्रे, प्रकाश मेहेत्रे, दिलीप आढाव, गिरीष वाघमारे, छोटू पवार, विलास विघ्ने, अतिष तायडे, अक्षय केळकर, तुळशीदास चौधरी यांच्यासह राजे जाधव घराण्याचे राजे गणेशराव जाधव, राजे भाबावनराव जाधव, हभप राजे मोहन राजे जाधव, राजे प्रतापराव जाधव, राजे ज्ञानेश राजे जाधव यांच्यासह सहा शाखेचे असंख्य वंशज उपस्थित होते. त्यानंतर घोडेस्वार जिजाऊंच्या वेशात बाल शिवबा व वेशातील मावळे यांच्यासह शेकडो महिला, मुली व जिजाऊ भक्तांची शोभायात्रा संपूर्ण गावातून काढण्यात आली. ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर जाहीर प्रबोधन कार्यक्रमात शोभायात्रेचे रुपांतर झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूणे येथील सरनौबत संजयराजे जाधव, उद्घाटक आ.डॉ.शशिकांत खेडेकर, प्रमुख पाहुणे म्हणून सिं.राजा नगरीतील अनेक मान्यवरांसह फकीरा जाधव, शंकर केळकर, चौधरी सर, प्रा.नाईकवाड उपस्थित होते. यावेळी राजे जाधव घराण्याचे अभ्यासक विनोद ठाकरे व प्रा.डॉ.घुगे यांची व्याख्याने झाली. तर जिजाऊ जन्मस्थळाचा विकास हाच उद्देश असल्याचे आमदार खेडेकर यांनी सांगितले. यावेळी राजे सुभाषराव, राजे मालाजीराव, राजे जगदीश, राजे हरिभाऊ, राजे विजराज, राजे बाळासाहेब, राजे संजयराव, राजे विठ्ठलराव, राजे नरेशराव, राजे दत्ताजीराव, राजे मनोजराव, राजे अविनाशराव, राजे अभिजीत, राजे दिपकरराव जाधव हे वंशज उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन गोपाळराजे जाधव यांनी प्रास्ताविक भागवतराजे जाधवांनी तर आभार ज्ञानेशराजे जाधवांनी मानले.