शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

ना पुस्तके ना वही, तरीही ऑनलाइन शिक्षणाची घाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 11:59 AM

Education Sector News : शैक्षणिक सत्रास सुरुवात करण्याची घाई करण्यात आली असल्याने विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.

- सुधीर चेके पाटीलचिखली : विदर्भातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे नवे शैक्षणिक सत्र २८ जूनपासून सुरू होत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे यंदाही ऑनलाइन पद्धतीनेच शाळा सुरू होणार आहेत. काही मोजक्या शाळांचा अपवाद वगळता इतर सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी मागचे वर्ष पाठ्यपुस्तकाविना कसेबसे ढकलले आहे. त्यात यंदाही पाठ्यपुस्तके उपलब्ध नसताना आणि ऑनलाइन शिक्षणात शिक्षकांना मर्यादा व अडचणी असताना  शैक्षणिक सत्रास सुरुवात करण्याची घाई करण्यात आली असल्याने विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.कोरोनामुळे मार्च २०२० पासून शाळा बंद आहेत. नोव्हेंबरमध्ये इयत्ता ९ ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू झाले. त्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये ५ वीपासून पुढील वर्ग भरविण्यात आले. मात्र, कोरोनाची दुसरी लाट धडकली आणि सर्व शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. यामध्ये दहावी, बारावीच्या परीक्षेबाबतही गोंधळ  उडाला असतानाच आता तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक असल्याची भीती असल्याने यंदाही विद्यार्थ्यांना स्वाध्याय उपक्रमाच्या माध्यमातून केवळ बाराखडी, आकडेमोड या पद्धतीचेच शिक्षण घ्यावे लागणार आहे. दरम्यान, विदर्भात २८ जून पासून नवीन शैक्षणिक सत्र या पद्धतीनेच सुरू होत आहे. गतवर्षी ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना दिवसभरात अथवा एक-दोन दिवसांत एखादा धडा विद्यार्थ्यांना शिकविला जात होता. त्यातही पाठ्य-पुस्तके नसल्याने प्रामुख्याने इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हे सर्व डोक्यावरून जाणारे ठरले. दरम्यान, स्वाध्याय उपक्रमास सुरुवात झाली. यामध्ये चिखली तालुका राज्यात अव्वल ठरला असला तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान या माध्यमातून भरून निघणारे नाही. परिणामी गतवर्षाचा पूर्ण अभ्यास बुडाला असे असले तरी आता प्रमोट होऊन पुढच्या वर्गात दाखल होणारे विद्यार्थी अभ्यासक्रमाबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. प्रामुख्याने विद्यार्थ्यांकडे साधनसुविधांचा अभाव असल्याने ऑनलाइन शिक्षणात यश नाही, हे गतवर्षीच सिद्ध झालेले आहे. त्यात यंदाही पाठ्यपुस्तकेच उपलब्ध नसल्याने शिक्षकांनी ऑनलाइन पद्धतीने शिकविले तरी ते समजणे अवघड आहे.  ऑनलाइन शिक्षण देण्याबाबत शिक्षकांसमोरही मर्यादा आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांतही संभ्रम आहे. ४६ हजार ५९ विद्यार्थी होणार प्रमोट चिखली तालुक्यात गतवर्षी इयत्ता १ ते १० पर्यंत एकूण ४६ हजार ५९ विद्यार्थीसंख्या होती. या विद्यार्थ्यांना यंदा ढकलपास (प्रमोट) करण्यात येणार आहे. दरम्यान, यंदा प्रथमच इयत्ता पहिलीत नवप्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्येही प्रवेशाबाबत संभ्रमावस्था आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducationशिक्षण