मजुरांसाठी स्वतंत्र वाहन नव्हते
कामावरील मजुरांसाठी स्वतंत्र वाहन नव्हते. साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनातूनच त्यांचा प्रवास होत होता. या भागातील रस्ते खराब झाले आहे. खराब रस्त्यामुळे कोठे पाणी आहे व कोठे खड्डा आहे याचा पत्ताच लागत नाही. रस्ता दुरुस्त करण्याबाबत वारंवार मागणी करूनही तो दुरुस्त केला गेला नाही. या दुर्घटनेस संबंधित कंपनी व कंत्राटदारही तितकेच जबाबदार आहेत.
(धनंजय घुगे, माजी सरपंच तढेगाव)
-- कंत्राटदाराचीही चूक--
या दुर्घटनेस कंत्राटदारही तितकाच जबाबदार आहे. ज्या ठिकाणी वाहन उलटले त्या परिसरातील रस्ताही मोठ्या प्रमाणावर खराब झालेला आहे. गेल्या काही वर्षापासून हे मजूर आमच्या गावपरिसरात कॅम्पमध्ये राहत आहेत. त्यांच्या कडून कधीच कुठल्याही ग्रामस्थांना त्रास झालेला नाही. दुर्घटनेस दोषी व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात यावे तथा मृत मजुरांच्या व जखमींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी संबंधितांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.