शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

यंदा ‘पाणीबाणी’ नाही; बुलडाणा शहरवासीयांना ऑगस्टपर्यंत दिलासा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:47 IST

बुलडाणा: शहराला पाणीपुरवठा करणार्‍या येळगाव धरणात मुबलक जलसाठा असून, पावसाळयापर्यंत शहराची तहान भागणार आहे. यामुळे गत अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात जाणवणार्‍या पाणीटंचाईची आणीबाणी यावर्षी बुलडाणेकरांना भासणार नाही. 

ठळक मुद्देयेळगाव धरणात पुरेसा जलसाठा 

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शहराला पाणीपुरवठा करणार्‍या येळगाव धरणात मुबलक जलसाठा असून, पावसाळयापर्यंत शहराची तहान भागणार आहे. यामुळे गत अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात जाणवणार्‍या पाणीटंचाईची आणीबाणी यावर्षी बुलडाणेकरांना भासणार नाही. यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे अनेक ठिकाणी जलसंकट ओढवले आहे. तथापि, शहरवासीयांना मात्र या संकटाला सामोरे जावे लागणार नाही. शहर व परिसरातील काही ग्रामीण भागात नगरपालिकेद्वारे १ लाख लोकसंख्येच्या वस्तीला पाणीपुरवठा करण्यात येतो. शहरी भागात नगरपालिकेद्वारे काही भागात जुनी पाइपलाइन तर काही भागात थ्री व्हॉल्व्ह सिस्टीमद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी शहर परिसरातील येळगाव धरणातून जलशुद्धीकरण केंद्र व या केंद्रातून शहरातील जलकुंभात पाणी येते. या जलकुंभात शहर परिसरात चवथ्या व पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गत काही वर्षात कमी पर्जन्यमानामुळे येळगाव धरणात जलसाठा कमी प्रमाणात होता. परिणामी नागरिकांना उन्हाळ्याच्या शेवटी पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते; मात्र यावेळी मागील दोन वर्षांपासून परिस्थिती बदलली आहे. धरणात ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरेल एवढा जलसाठा उपलब्ध आहे. पिण्याच्या पाण्याचे संकट नसले तरी जनतेने पाण्याचे नियोजन व काटकसरीने वापरण्याची गरज आहे.  

येळगाव धरणात ५.१0 दलघमी जलसाठाबुलडाणा शहरासह ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणार्‍या येळगाव धरणात पाणीसाठय़ाची क्षमता १२.४0 दलघमी आहे. यावर्षी पावसाळय़ाच्या शेवटी धरण जवळपास १00 टक्के भरले होते. सध्या धरणात ५.१0 दलघमी जलसाठा असून, ऑगस्ट महिन्यापर्यंत शहरवासीयांसह ग्रामीण भागाला पाणीपुरवठा होऊ शकतो. ऑगस्ट महिन्यापूर्वीच पावसाळा सुरू होणार असल्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही. 

‘अवैध नळधारकांवर कारवाई व्हावी!’शहर परिसरात अनेक भागात अवैध नळधारक आहेत. अशा नळधारकांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन पालिकेद्वारे पाणीटंचाई काळात किंवा उन्हाळ्यात दिले जाते; मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर या कारवाईकडे कोणीही लक्ष देत नाही. परिणामी दरवर्षी अवैध नळधारकांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. पालिकेने आताच अवैध नळधारकांवर कारवाई करण्याची गरज आहे. 

शहरवासीयांना उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी पुढाकार घेऊन नळाला तोट्या लावाव्यात तसेच पाण्याचा अपव्यय होणार नाही, यासाठी काळजी घ्यावी. - करणकुमार चव्हाणमुख्याधिकारी, नगरपालिका, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाyelgao damयेळगाव धरण