बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी साधला उन्नतीचा मार्ग
धामणगाव धाड: बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी उन्नतीचा मार्ग साधला आहे. बचत गटामुळे आर्थिक उन्नती कशी साधता येते, यासंदर्भात महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी येथील सामाजिक सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी विविध प्रकारचे दुकाने थाटली होती. परिसरातील बहुसंख्य बचत गटाच्या महिलांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
खासगी कोविड सेंटर बंद
बुलडाणा: खासगी कोविड रूग्णालयांकडून रूग्णांची पिळवणूक होत असल्याचे निदर्शनास येताच, शासनाने कोरोना उपचाराचे दर ठरवून दिले होते. त्यानंतर जिल्ह्यातील सहा पेक्षा अधिक कोरोना रूग्णालय बंद करण्यात आले होते. परंतू जिल्ह्यात आता कोरोना रुग्ण कमी झाल्याने खासगी कोविड सेंटर बंद पडत असल्याचे चित्र आहे.
बुलडाणा शहरात पावसाची हजेरी
बुलडाणा : शहरात गुरूवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, दुपारी तुरळक स्वरूपात पडला आहे. २९ जुलै रोजी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. बुलडाणा तालुक्यात आतापर्यंत सरासरी ३३५.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडली
बुलडाणा: सन २०१९ मधील शेतकरी कर्जमाफीचा लाभ आतापर्यंत १ लाख ७१ हजार १७ शेतकऱ्यांना मिळाला असून, त्यांना १ हजार १२० कोटी ३९ लाख १० हजार रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. अद्याप २४ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही.
पलढग परिसरातील हिरवळ ठरतेय लक्षवेधी!
बुलडाणा: ज्ञानगंगा अभयारण्यातील पलढक धरण परिसरात आता हिरवळ उगवली आहे. त्यामुळे ग्रीष्माच्या काळात येथील नैसर्गिक सौंदर्य खुलेले आहे. सद्या वन पर्यटनाला बंदी असल्याने ज्ञानगंगा अभयारण्यातील हे वैभव पाहण्यासठी पर्यटकांना येथे सद्या जाता येत नाही.