चिखली (बुलडाणा): येथील श्री १00८ महावीर दिगंबर जैन मंदिरात मुनिश्री विशेषसागर महाराजांनी, या ठिकाणी प्रवचन देण्यासाठी आलो नसून, समाजाला जागविण्यासाठी आलो आहे, असा संदेश दिला. त्यांचे ९ मार्च रोजी आगमन झाले. त्यांच्या दर्शनासाठी मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला. जैन समाजाला जागृत करण्यासाठी आलेले मुनिश्री विशेषसागर ९ मार्च रोजी शहरात अचानक आले. दिगंबर संतांना जिनागमामध्ये अतिथी म्हणून संबोधण्यात आले असून, यानुसार त्यांची येण्याची वा जाण्याची तिथी कधीही निश्चित नसते. मी चिखली येथे प्रवचन देण्यासाठी किंवा ऐकविण्यासाठी वा शिकविण्यासाठी आलेलो नाही, तर जैन समाजाला जागविण्यासाठी आलो असल्याचे प्रतिपादन मुनिङ्म्री विशेषसागर महाराजांनी आपल्या प्रवचनादरम्यान केले. मुनिश्री विशेषसागर महाराज हे प.पु.राष्ट्रसंत गणाचार्य ङ्म्री १0८ विराग सागरजी महाराजांचे शिष्य आहेत. त्यांच्या आगमनाने धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. संत महात्म्यांचे दर्शन होणे हे पंचमकालातील चमत्कार मानले जात आहे. दरम्यान मुनीङ्म्रींच्या उपस्थितीने जैन समाजात नवचैतन्य पसरले असून, भाविक गुरू दर्शन व गुरूवाणीचा लाभ घेत आहेत. दिगंबर मुनी त्याग, तपस्या व साधनेचे मूर्तिमंत उदाहरण असून, भौतिकवादापासून दूर असलेल्या मुनिङ्म्री विशेषसागर महाराज यांचे दररोज सकाळी ८ ते ९ व सायंकाळी ६ ते ७ दरम्यान पार पडणार्या गुरुवाणीचा व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री १00८ महावीर दिगंबर जैन मंदिराच्यावतीने करण्यात आले आहे.
प्रवचनासाठी नव्हे, तर समाजजागृतीसाठी आलो- मुनिश्री विशेषसागर महाराज
By admin | Published: March 13, 2016 2:04 AM