शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

बुलडाणा जिल्ह्यात वर्गच नव्हे, मुलांचे स्वागतही होणार ऑनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 12:01 PM

Education Sector News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शाळेतील वर्गच नव्हे, तर मुलांचे पहिल्या दिवशी स्वागतही ऑनलाइन होणार आहे.

- ब्रह्मानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: शाळेचा पहिला दिवस म्हणजे मुलांसोबतच त्या शिक्षकांसाठीही न विसरणारा असतो. परंतू कोरोनामुळे शाळेचा पहिला दिवस केवळ आठवणी राहिल्याची खंत काही शिक्षकांनी लोकमतकडे शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला व्यक्त केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शाळेतील वर्गच नव्हे, तर मुलांचे पहिल्या दिवशी स्वागतही ऑनलाइन होणार आहे. घंटा ऐवजी मोबाईलची रिंग वाजणार आहे. जिल्ह्यात २८ जूनपासून जिल्हा परिषदसह नगर पालिका, अनुदानित, विनाअनुदानीत व सर्व माध्यमांच्या शाळा सुरू होत आहेत. परंतू कोरोना विषाणू संसर्गामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही शाळा ऑनलाइनच राहणार आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे शाळेच्या पहिल्या दिवशी होणारा शाळेतील किलबिलाट ऐकायला मिळणार नाही. मुलांचा शाळा प्रवेशोत्सव व त्यांचे स्वागतही ऑनलाइनच होणार आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गात सहभागी होता यावे, यासाठी जिल्ह्यातील शिक्षकांनी प्रयत्न केल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.

असा राहणार पहिला दिवसजिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शाळेच्या पहिल्या दिवशी वेगवेगळ्या शाळेला भेटी देऊन मुलांचे स्वागत करणे, त्यांना नवीन गणवेश, पुस्तके भेट देणे असा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. मात्र यंदा ऑनलाइन शाळेने यात मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे त्यांच्या टिमसह शाळेच्या पहिल्या दिवशी जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी बहुल गाव असलेल्या चारबन येथील जिल्हा परिषद शाळेत जाणार आहेत. त्यानंतर जवळपास ९० विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा ऑनलाइन वर्ग भरविण्यात येणार आहे. ज्यामध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते मार्गदर्शन करणार आहेत. या ऑनलाइन वर्गात पालकांचाही सहभाग राहणार आहे. यावेळी मुलांचे ऑनलाइन स्वागत करण्यात येणार आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्र