बुलडाणा: संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानातंर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा होत असून यामध्ये ग्रामस्वच्छतेसोबतच ग्रामपंचायतीध्ये स्पर्धा होऊन प्रभाग ते राज्यस्तरापर्यंत बक्षीसे दिली जाणार आहेत. एक आॅक्टोबर ते ३१ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत प्रत्येक ग्रामपंचायतीत राबविल्या जाणार्या अभियानात प्रत्येक ग्रामपंचायतीत उत्कृष्ठ प्रभागास दहा हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्यावतीने करण्यात आले आहे. सध्या स्पर्धेस सुरूवात झाली आहे. गावामध्ये स्वच्छता राहून आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी जिल्हा परिषदेतंर्गत राज्यभर हे अभियान सध्या राबविण्यात येत आहे. त्यातंर्गत पाणी गुणवत्ता व व्यवस्थापन, शौचालय व्यवस्था, शौचालयाचा वापर, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, परिसर स्वच्छता या बरोबरच लोकसहभागातून राबविण्यात आलेले उपक्रम यासह अन्य काही बाबीं स्पर्धेदरम्यान तपासल्या जाणार आहेत. स्पर्धेमध्ये वरचढ ठरण्यासाठी ग्रामपंचायतींनी पाणी पट्टी ते परिसर स्वच्छतेच्या मुद्द्यावर भर देणे गरजेचे आहे. या स्पर्धेत उत्कृष्ठ प्रभागासाठी दहा हजार रुपये, गट स्पर्धेसाठी ५० हजार रुपये, जिल्हास्तरावर प्रथ येणार्या ग्रामपंचातीस पाच लाख रुपये, द्वितीय येणार्या ग्रामपंचायतील तीन लाख, तृतीय येणार्या ग्रामपचातीस दोन लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे. विभाग व राज्यस्तरावरही त्यापद्धतीने बक्षीसे देण्यात येणार आहे. हे अभियान जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी अधिकारी कर्मचार्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष उमा तायडे व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी ष्णमुखराजन एस यांनी सुचना दिल्या आहेत.
आता ग्रामपंचायत प्रभागस्तरावरही स्वच्छता स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 2:36 PM
बुलडाणा: संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानातंर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा होत असून यामध्ये ग्रामस्वच्छतेसोबतच ग्रामपंचायतीध्ये स्पर्धा होऊन प्रभाग ते राज्यस्तरापर्यंत बक्षीसे दिली जाणार आहेत.
ठळक मुद्देअभियानात प्रत्येक ग्रामपंचायतीत उत्कृष्ठ प्रभागास दहा हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. स्पर्धेमध्ये वरचढ ठरण्यासाठी ग्रामपंचायतींनी पाणी पट्टी ते परिसर स्वच्छतेच्या मुद्द्यावर भर देणे गरजेचे आहे.