आषाढात शुभ तारखा
पूर्वी आषाढात लग्नकार्य करणे शुभ समजले जात नव्हते. मात्र आता आषाढातही लग्ने लावली जात आहेत. आषाढातही पंचांगानुसार शुभ तारखा आहेत. त्यामुळे अनेक जण आषाढातील मुहूर्तावरही लग्न लावत आहेत. शुभ मुहूर्त म्हणजे ग्रह आणि नक्षत्रांची अनुकूल स्थिती. विवाहामध्ये शुभ मुहूर्ताची विशेष काळजी घेतली जाते, कारण लग्न हे संपूर्ण आयुष्याचे नाते असते.
- शाम पाठक, पंडित
परवानगी ५० चीच पण...
राज्य शासनाने कोविड १९च्या अनुषंगाने डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढल्यामुळे काही निर्बंध लागू करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात तिसऱ्या श्रेणीतील निर्बंध २८ जूनपासून लागू करण्यात आलेले आहेत. त्यानुसार लग्न समारंभात बँड पथक, कॅटरिंग आदींसह पूर्वपरवानगीने कोविड नियमांचे पालन करून ५० व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. मात्र त्या नियमांचे पालन पाहिजे तसे होत नाही.
मंगल कार्यालये बुक
आषाढातील मुहूर्तावरही लग्नसमारंभासाठी मंगल कार्यालये बुक करण्यात आलेली आहेत. कोरोनामुळे मंगल कार्यालय चालकांचे मोठे नुकसान झालेले आहे. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून मंगल कार्यालयांना विवाह समारंभासाठी तारखा मिळत असल्याचे चित्र आहे.